शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रशियातील दुर्घटनेत सीवूडच्या तरुणीचा मृत्यू

By admin | Updated: February 16, 2016 03:40 IST

रशियातील मॉस्को येथे रविवारी पहाटे रशियातील स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल अ‍ॅकॅडमीमध्ये लागलेल्या आगीत दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे.

सुर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईरशियातील मॉस्को येथे रविवारी पहाटे रशियातील स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल अ‍ॅकॅडमीमध्ये लागलेल्या आगीत दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही विद्यार्थिनी भारतीय असून, एक पुणे येथील तर दुसरी नवी मुंबईमध्ये सीवूड येथील राहणारी आहे. स्मोलेन्स्क अ‍ॅकॅडमीत सुमारे दोन हजार विद्यार्थी शिकत असून, त्याच ठिकाणी या विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. रविवारी (१४ फेब्रुवारी) पहाटे ४.१५ (भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३०) अ‍ॅकॅडमीच्या वसतिगृहात आग लागली. या वेळी पुण्याची करिश्मा भोसले व सीवूडची पूजा कल्लूर या दोघी एकाच खोलीमध्ये झोपलेल्या होत्या. मात्र, काही वेळातच सर्वत्र आग पसल्याने त्यांना खोलीतून बाहेर निघता आले नाही व आतमध्येच गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. इतर विद्यार्थ्यांनी मात्र वेळीच बाहेर पळ काढला, तर काहींना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.पूजाचे वडील सिद्दपा कल्लूर यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी स्मोलेन्स्क अ‍ॅकॅडमीमध्ये संपर्क साधला, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. शिक्षणासाठी परदेशात गेलेली मुलगी सुखरूप असल्याची खात्री करून घेण्यासाठी ते सातत्याने भारतीय व रशियन राजदूतांनाही संपर्क साधत होते, परंतु अनेक प्रयत्न करूनही त्यांच्या पदरी निराशाच पडत होती. अखेर भारतातील ज्या कन्सल्टंट्समार्फत त्यांनी रशियातील स्मोलेन्स्क मेडिकलमध्ये पूजाचा एमबीबीएससाठी प्रवेश घेतला होता, त्या कॉसमॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्समध्ये संपर्क साधल्यावर, त्यांना पूजाच्या निधनाची माहिती मिळाली. तोपर्यंत सुमारे आठ तासांचा कालावधी निघून गेला होता. घटना घडताच अ‍ॅकॅडमीने पूजाच्या कुटुंबीयांना तिच्या मृत्यूची माहिती देणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. घटनेच्या काही तास अगोदरच त्यांचे पूजासोबत चॅटिंग झाले होते. मोठा भाऊ शिक्षणासाठी युरोपच्या हंगेरी येथे जाणार असल्याने त्यांच्यात हे संभाषण झाले होते. त्यानंतर पूजाचा कधीच संपर्क होणार नाही, याची कल्पनाही त्यांना नव्हती. वसतिगृहातल्या या दुर्घटनेला अ‍ॅकॅडमी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पूजाचे वडील सिद्दपा यांनी केला आहे. पूजा व करिश्माला आगीची माहिती कळलेली की नाही, त्या ठिकाणी फायर अलार्म सीस्टिम होती का, अशा अनेक शंका त्यांना सतावत आहेत. त्याचे निराकरण करून घेण्यासाठी आगीच्या घटनेचा अहवाल मागवणार असल्याचेही सिद्दपा कल्लूर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, बुधवारी पूजाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात मिळण्याची शक्यता आहे.