शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधल्या पर्यायी शाही मार्गावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: January 9, 2015 01:20 IST

गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी दुर्घटनेस कारणीभूत झालेल्या अरुंद शाही मिरवणूक मार्गात बदल करण्यास साधू-महंतांनी सहमती दर्शवित नव्या पर्यायी मार्गावर शिक्कामोर्तब केले.

नाशिक : गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी दुर्घटनेस कारणीभूत झालेल्या अरुंद शाही मिरवणूक मार्गात बदल करण्यास साधू-महंतांनी सहमती दर्शवित नव्या पर्यायी मार्गावर शिक्कामोर्तब केले. परतीच्या अरुंद मार्गाचा विचार करता, त्यातही बदल करण्यास साधु-महंतांनी अनुकूलता दर्शविल्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या प्रारंभीच पर्यायी शाही मिरवणूक मार्गाला पसंती व साधुग्रामसाठी जागा अधिग्रहीत करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने शाही मिरवणूक मार्गात काही बदल करून औरंगाबादरोडने मिरवणूक काट्यामारुती चौकात व तेथून गणेशवाडी मार्गे पुढे नेण्याचा प्रस्ताव सादर केला असता, त्यास लोकप्रतिनिधींनी विरोध केला. या बैठकीत मंजूर कण्यात आलेल्या पर्यायी मार्गाचा विचार करता, काट्यामारुती चौकापासून आता गणेशवाडी मार्गे गाडगेमहाराज पुलाखालून शाही मिरवणूक सरदार चौकातून रामकुंडाकडे रवाना होईल. गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सरदार चौकालगतच्या अरुंद जागेत चेंगराचेंगरी होऊन ३२ भाविकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. मात्र स्थानिक नागरिकांनी रुंदीकरणाला विरोध दर्शविल्याने महापालिकेनेही याबाबत आस्तेकदम भूमिका घेतली.