शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूरमध्ये दुसऱ्या दिवशीही शोधमोहीम

By admin | Updated: January 25, 2016 02:52 IST

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून, राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाने (एनआयए) शनिवारी वैजापूरच्या इम्रान या तरुणास ताब्या

मोबीन खान,  वैजापूर (जि. औरंगाबाद)इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून, राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाने (एनआयए) शनिवारी वैजापूरच्या इम्रान या तरुणास ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीही एनआयएची शोधमोहीम सुरू होती. तपास यंत्रणा प्रकरणाची पाळेमुळे खोदण्याचा प्रयत्न करत आहेत.वयाच्या २६ वर्षांपर्यंत स्थानिक पोलिसांच्या गुन्हा वहीमध्ये नोंद नसलेला इम्रान आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनेशी कसा जोडला गेला? त्याच्या आडून कोण सूत्रे हलवित आहेत? याचा शोध घेतला जात आहे. मित्रांमध्ये ‘ओबामा’ टोपण नावाने ओळखला जाणारा इम्रान शांत व मनमिळाऊ स्वभावाचा आहे. इम्रानला शिक्षणापेक्षा संगणकाची अधिक गोडी लागली होती. तो बहुसंख्य वेळ मोबाइल व कॉम्प्युटरवरच असायचा. २०१४-१५ मध्ये त्याने मुंब्रा (जि. ठाणे) येथे भाड्याने खोली घेऊन, अंधेरी (मुंबई) येथे एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळविली. त्याच दरम्यान, मुंब्रा येथे त्याचे अतिरेकी संघटनांशी सूर जुळल्याचा पोलिसांना संशय आहे. आॅक्टोबरमध्ये त्याने नोकरी सोडून वैजापूर गाठले. तो कॉम्प्युटर व लॅपटॉप दुरुस्तीचे काम करतच होता. तो दिवसभर झोपायचा आणि अख्खी रात्र बंद खोलीत संगणकावर काम करायचा. मित्रांना व नातेवाईकांना भेटल्यानंतर, तो ‘जिहाद’बद्दल सांगायचा. व्हॉटस्अ‍ॅप व फेसबुकवरसुद्धा तो त्याचा उल्लेख करत असे. त्याचे अनेकांनी समुपदेशन केले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.एटीएस पथकाने शनिवारी इम्रानला ताब्यात घेतल्यानंतर, दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासूनच पुन्हा अत्यंत गोपनीय पद्धतीने शहरातील विविध भागांत छापे मारले. शहरात आणखी कोणी संशयित अतिरेकी आहे का, याचा शोध सुरू आहे. इम्रान मुंबईहून परतल्यानंतर तासन्तास आॅनलाइन असायचा, त्याचाही अभ्यास केला जात आहे.