शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सहा फरार दहशतवाद्यांचा ‘एटीएस’कडून शोध

By admin | Updated: January 23, 2015 01:33 IST

खंडवा कारागृहातून २०१३ साली फरार झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणांमधील सहा दहशतवाद्यांचा दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) शोध घेण्यात येत आहे.

अकोला : खंडवा कारागृहातून २०१३ साली फरार झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणांमधील सहा दहशतवाद्यांचा दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) शोध घेण्यात येत आहे. लूटमार आणि दरोडे टाकून जमवलेल्या पैशातून ते दहशतवादी कारवाया करीत असल्याची माहिती अकोला एटीएस अधिकाऱ्यांनी दिली.खंडवा येथील महेबूब ऊर्फ गुड्डू ऊर्फ मलिक ऊर्फ रमेश ऊर्फ समीर ऊर्फ अफताब ऊर्फ किसन इस्माईल खान (३२), अमजद खान ऊर्फ पप्पू ऊर्फ दाऊद रमजान खान (२६), अस्लम महंमद ऊर्फ असलम खान ऊर्फ साहेब ऊर्फ बिलाल ऊर्फ संतोष अयुब खान (२८), महंमद एजाजुद्दीन ऊर्फ एजाज ऊर्फ राजा ऊर्फ रियाज ऊर्फ राहुल ऊर्फ जॉन ऊर्फ अरविंद महंमद अजीजोद्दीन (३२), जाकीर हुसैन ऊर्फ सादीक ऊर्फ सिद्धीक ऊर्फ विक्की डॉन ऊर्फ विनयकुमार बदरूल हुसैन (२७) आणि मो.सलीक अब्दुल हकीम (३२) हे दहशतवादी आॅक्टोबर २०१३ मध्ये खंडवा कारागृहातून फरार झाले होते. त्यांनी उत्तर प्रदेशातील बिजनौर शहरात भाड्याने खोली घेतली आणि तिथे बारूद व जिलेटीनचा वापर करून बॉम्ब बनवित असताना अचानक स्फोट झाला. यात गुड्डू उर्फ महेबूब हा जखमी झाला होता. पुण्यातील बॉम्बस्फोटामध्येही या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. या दहशतवाद्यांचा म्होरक्या अबू फैजल याला २३ डिसेंबर रोजी एटीएसने अटक केली होती. हे दहशतवादी कुठेही दिसल्यास नागरिकांनी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन अकोला एटीएसने केले आहे. (प्रतिनिधी)