शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पालीचा शोध !

By admin | Updated: September 27, 2016 21:49 IST

मध्य व पश्चिम भारतात आढळणाऱ्या एका नव्या पालीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले

गजानन दिवाण/ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 27 - मध्य व पश्चिम भारतात आढळणाऱ्या एका नव्या पालीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले असून या पालीला ‘सिर्टोडक्टलस वरद गिरी’ असे मराठी नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क, मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील अमरावती, चंद्रपूर परिसरात ही पाल सापडते. तब्बल १३० वर्षांनंतर देशात या पालीचे दर्शन झाले आहे. अमेरिकतील व्हिलनोव्हा विद्यापिठातील डॉ. इशान अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात बंगळूरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायलॉजकिल सायन्सेसचे झिशान मिर्झा, अनुराग मिश्रा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सौनक पाल आणि व्हिलनोव्हा विद्यापीठातील डॉ. अरूण बौर यांच्या पथकाने तब्बल सहा वर्षे या पालीचा अभ्यास केला. शुक्रवारी यासंदर्भातील पेपर ‘झुटाक्सा’ या सायंटिफिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे. ही पाल सहा सेंटीमीटरपर्यंत वाढते. विशेषत: जंगलात आढळणारी ही पाल दिवसा पाला-पाचोळा किंवा दगडाखाली राहते आणि केवळ रात्री बाहेर पडते. ही पाल पावसाळ्यातच ब्रीडिंग करते.

महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेशातील एका परिसरात या पालीची नोंद झाली आहे. जगभराचा विचार केल्यास पालीची ही पोटजात आग्नेय आशिया, श्रीलंका आणि भारतात सापडते. देशात पालीच्या साधारण २९० प्रजाती आढळतात. या नव्या संशोधनाने यात आणखी एकाची भर पडली असल्याची प्रतिक्रिया बंगळूरू येथील ‘नॅशनल सेंटर फॉर बायलॉजकिल सायन्सेस’चे वरद गिरी यांनी ‘लोकमत’ला दिली. मराठी नावच का?कोल्हापूर जिल्ह्यातील राजगोळी या गावात जन्मलेल्या वरद गिरी यांच्या नावाने या पालीचे बारसे करण्यात आले आहे. गिरी सध्या बंगळूरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायलॉजकिल सायन्सेसमध्ये कार्यरत असून सरपटणाऱ्या प्राण्यांवर गेल्या २० वर्षांपासून ते काम करीत आहेत. त्यांनी स्वत: आतापर्यंत ३५ प्रजातींचा शोध लावला आहे. त्यांचे नाव या पालीला देऊन त्यांच्या कार्याला या संशोधकांनी सलाम केला आहे. याआधीही जर्मनीच्या संशोधकाने शोधलेल्या सापाला आणि पश्चिम घाटात एका पालीला वरद गिरी यांचे नाव देण्यात आले आहे.