शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पालीचा शोध ! मराठी नावाने बारसे

By admin | Updated: September 27, 2016 11:36 IST

मध्य व पश्चिम भारतात आढळणाऱ्या एका नव्या पालीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले असून या पालीला ‘सिर्टोडक्टलस वरद गिरी’ असे मराठी नाव देण्यात आले.

गजानन दिवाण,ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद , दि. २७ -  मध्य व पश्चिम भारतात आढळणाऱ्या एका नव्या पालीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले असून या पालीला ‘सिर्टोडक्टलस वरद गिरी’ असे मराठी नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क, मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील अमरावती, चंद्रपूर परिसरात ही पाल सापडते. तब्बल १३० वर्षांनंतर देशात या पालीचे दर्शन झाले आहे. अमेरिकतील व्हिलनोव्हा विद्यापिठातील डॉ. इशान अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात बंगळूरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायलॉजकिल सायन्सेसचे झिशान मिर्झा, अनुराग मिश्रा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सौनक पाल आणि व्हिलनोव्हा विद्यापीठातील डॉ. अरूण बौर यांच्या पथकाने तब्बल सहा वर्षे या पालीचा अभ्यास केला. शुक्रवारी यासंदर्भातील पेपर ‘झुटाक्सा’ या सायंटिफिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे. ही पाल सहा सेंटीमीटरपर्यंत वाढते. विशेषत: जंगलात आढळणारी ही पाल दिवसा पाला-पाचोळा किंवा दगडाखाली राहते आणि केवळ रात्री बाहेर पडते. ही पाल पावसाळ्यातच ब्रीडींग करते. महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेशातील एका परिसरात या पालीची नोंद झाली आहे. जगभराचा विचार केल्यास पालीची ही पोटजात आग्नेय आशिया, श्रीलंका आणि भारतात सापडते. देशात पालीच्या साधारण २९० प्रजाती आढळतात. या नव्या संशोधनाने यात आणखी एकाची भर पडली असल्याची प्रतिक्रिया बंगळूरू येथील ‘नॅशनल सेंटर फॉर बायलॉजकिल सायन्सेस’चे वरद गिरी यांनी ‘लोकमत’ला दिली.

मराठी नावच का?कोल्हापूर जिल्ह्यातील राजगोळी या गावात जन्मलेल्या वरद गिरी यांच्या नावाने या पालीचे बारसे करण्यात आले आहे. गिरी सध्या बंगळूरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायलॉजकिल सायन्सेसमध्ये कार्यरत असून सरपटणाऱ्या प्राण्यांवर गेल्या २० वर्षांपासून ते काम करीत आहेत. त्यांनी स्वत: आतापर्यंत ३५ प्रजातींचा शोध लावला आहे. त्यांचे नाव या पालीला देऊन त्यांच्या कार्याला या संशोधकांनी सलाम केला आहे. याआधीही जर्मनीच्या संशोधकाने शोधलेल्या सापाला आणि पश्चिम घाटात एका पालीला वरद गिरी यांचे नाव देण्यात आले आहे.