शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पिशवीवरील नावावरून घेतला आरोपीचा शोध

By admin | Updated: January 29, 2016 02:25 IST

एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस कधी वेषांतर करतात, तर एका छोट्याशा धाग्यादोऱ्यावरून आरोपीचा शोधही घेतात. अशीच काहीशी कामगिरी मुंबई रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली.

मुंबई: एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस कधी वेषांतर करतात, तर एका छोट्याशा धाग्यादोऱ्यावरून आरोपीचा शोधही घेतात. अशीच काहीशी कामगिरी मुंबई रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली. प्लॅस्टिक पिशवीवरील नावावरून एका खुनातील आरोपीचा शोध रेल्वे पोलिसांकडून घेण्यात आला आणि २९ वर्षीय किरण गायकवाड या आरोपीला अटक केली. २४ जानेवारी रोजी सायंकाळी १६.४५ वाजता दादर-डहाणू शटलसेवा दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर उभी होती. व्यवसायाने कंत्राटदार असलेले हरीश पवार आणि त्यांचा मित्र संतोष भुसारा हे या ट्रेनच्या डब्यात बसले होते. त्याच वेळी प्लॅटफॉर्मवरील बाकावर किरण गायकवाड हा आपल्या मैत्रिणीसोबत बसला होता. हरीश याने आपल्या मोबाइलमधून किरणसोबत असलेल्या मुलीचा फोटो काढला. हा प्रकार पाहताच किरणने ट्रेनमध्ये जाऊन हरीशला जाब विचारला आणि मोबाइल खेचून हरीशला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर किरण हा ट्रेनमधून उतरून निघून गेला. हरीशला मारहाण झाल्याने बराच त्रास होऊ लागला आणि प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या वेळी त्याच्यासोबत असलेल्या संतोष भुसारा याने मुंबई सेंट्रल जीआरपीमध्ये तक्रार नोंदविली. गुन्हे शाखेतील पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या वेळी दादर येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये किरणसोबत असलेली मुलगी आणि एक अनोळखी मुलगा स्टेशनच्या पुलावर बोलत असताना दिसले आणि तिच्या हातात कपडे खरेदी केलेली प्लॅस्टिकची पिशवी होती. त्या पिशवीवर ‘इझी बाय’ असे नाव नमूद होते. इंटरनेटच्या माध्यमातून या नावाचा शोध घेतला असता, विरार, बोरीवली, सांताक्रुझ, विलेपार्ले आणि वांद्रे या ठिकाणी अशा प्रकारची दुकाने असल्याचे निदर्शनास आले. त्यात प्रथम विरार येथील ‘इझी बाय’ नावाच्या दुकानात जाऊन सीसीटीव्ही फुटेजमधील मुलगी दाखविली असता, तिला ओळखत असल्याचे दुकानदाराकडून सांगण्यात आले. त्यानुसार त्या मुलीचा फोननंबर दुकानदाराकडून घेऊन, अधिक चौकशी केल्यावर आरोपी किरणला तत्काळ डहाणू येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आले. पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार, सहायक पोलीस निरीक्षक किरत मतकर यांसह अन्य पोलिसांनी या प्रकरणाचा यशस्वी तपास केला.