शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्रे सील करणारी राजमुद्रा हटविली

By admin | Updated: October 17, 2014 01:03 IST

निवडणुकीच्या कामकाजात पारदर्शकता राहावी, यासाठी प्रारंभीपासून मतपेटी, मतदान यंत्र सील करण्यासाठी लाखेच्या वापर केला जातो. सील करताना राजमुद्रा असलेल्या चिन्हाचा वापर केला जायचा.

सामान्य सील आणले : ‘एम’ अक्षराच्या शिक्क् ्यांचा वापरगणेश वासनिक - अमरावतीनिवडणुकीच्या कामकाजात पारदर्शकता राहावी, यासाठी प्रारंभीपासून मतपेटी, मतदान यंत्र सील करण्यासाठी लाखेच्या वापर केला जातो. सील करताना राजमुद्रा असलेल्या चिन्हाचा वापर केला जायचा. मात्र यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत सामान्य मुद्रा असलेले चिन्ह सील करताना वापर होत आहे.१९५२ ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मतयंत्रे, पॅकेट, मतपेटी आदी साहित्यावर मोहोर लावून ते सील करताना राजमुद्रा असलेले चिन्ह असणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सील करताना सामान्य चिन्ह असलेली 'एम' मुद्रा वापरण्यात आल्याने याचा अर्थ काय समजावे, हा प्रश्न पडला आहे. राजमुद्रा हटविण्याचा निर्णय कोणत्या अधिकाऱ्यांनी घेतला हे कळेनासे झाले आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे.अचानक १९५२ नंतर विधानसभा निवडणुकीत राजमुद्रेऐवजी सामान्य चिन्हाचे सील करण्याचा निर्णय आयोगाने कोणाच्या आदेशानुसार घेतला, हे गुलदस्त्यात आहे. निवडणुकीत साहित्य सील करताना राजमुद्रा हटविण्यात आल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याचा अटीवर दिली आहे. मतपेटी, मतयंत्रे, पॅकेट आदी साहित्य सील करताना सामान्य चिन्हाचे सील लावण्यामागे कोणाचे डोके आहे, हे देखील संशोधनाची बाब आहे. पूर्वी राजमुद्रेचे चिन्ह असलेली धातुची मोहोर सील करुन ते साहित्य सुरक्षेत ठेवले जायचे. सील झाल्यानंतर ठळकपणे राजमुद्रा उमटायची. परंतु आता सामान्य चिन्ह असलेली धातुची मोहोर सील करण्यासाठी वापरली जात आहे. राजमुद्रेऐवजी उमटते ‘एम’मतयंत्रे, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, महत्त्वाचे लिफाफे सील करण्यासाठी नवीन शिक्क् ्यांचा पहिल्यांदाच वापर होत आहे. लाकडी मूठ असलेला हा शिक्का धातूची मोहोर (मेटेल सील) उमटविण्यासाठी आहे. मात्र सील करताना राजमुद्रेऐवजी ‘एम’ व प्रोसेडिंग आॅफिसर, असे उमटत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने सामान्य सील करण्याचा निर्णय कोण्याचा आदेशाने घेतला, हे शोधून काढणे गरजेचे आहे.