शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलसह ६० गाळ्यांना ठोकले सील

By admin | Updated: June 30, 2016 02:40 IST

परवानगी न घेता व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे.

नवी मुंबई : परवानगी न घेता व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. शहरातील ६० हॉटेल, बेकरी व खाद्यपदार्थांची दुकाने सील केली आहेत. पालिकेच्या स्थापनेपासून ही सर्वात मोठी कारवाई असल्याने विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरही नवी मुंबईची स्मार्ट सिटी होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. नियम धाब्यावर बसविणाऱ्यांविरोधात पालिकेने जोरदार कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमण हटविण्याबरोबर पालिकेचा महसूल बुडविणाऱ्यांवरही कडक कारवाई सुरू केली आहे. शहरामधील हॉटेल, मिठाईची दुकाने, बेकरीसह फास्ट फूडचा व्यवसाय करणाऱ्यांनी पालिकेकडून व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहेत. परवान्याचे नियमितपणे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. परंतु अनेक व्यावसायिकांनी पलिकेचे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू केला आहे. अशा विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. परवाना विभागाचे अधिकारी दत्तात्रेय नांगरे व त्यांच्या पथकाने पालिकेचा परवाना न घेतलेल्या सर्वांना नोटीस बजावल्या आहेत. नोटीस पाठवूनही परवाना न घेणाऱ्यांची दुकाने सील करण्यात येत आहेत. गत दोन आठवड्यामध्ये एकूण ६० हॉटेल व इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. वाशीमध्ये सर्वाधिक १५ दुकाने सील केली आहेत. द बेक शॉप, बेंगलोर आय्यंगार बेकरी, माँजिनीज, बिकानेर या नामांकित दुकानांवरही कारवाई केली आहे. नेरूळमधील झामासह सेक्टर ६ मधील गोल्डन गेट बारवरही कारवाई केली आहे. महापालिकेची स्थापना झाल्यापासून प्रथमच परवाना न घेणाऱ्यांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत पालिकेच्या नोटीसकडे गांभीर्याने लक्ष न देणाऱ्या व्यापाऱ्यांचे गाळे सील झाल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहे. परवाना असेल तरच व्यवसाय करता येईल अशी स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी परवानगीसाठी धावपळ सुरू केली आहे. पालिकेच्या परवाना विभागात हॉटेल, स्वीट्स व इतर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठीचे अर्ज मोठ्याप्रमाणात येवू लागले आहेत. (प्रतिनिधी)>कारवाईचा तपशील वाशी : आलिशा हॉस्पिटॅलिटी, ज्युस फॅक्टरी, के. जी. बी. हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस, चायनीज फूड, पिझेरीया हाऊस, वैष्णवी फूड्स, ला ग्रीलस चायनीस स्पाईस, बिर्याणी दरबार, गवई हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस, कॉम्बो ब्रेकर, चायना लँड, इटालियन हाऊस, फास्ट फूड फॅक्टरी, केरला फूड एक्स्प्रेस, अहम चिकन एल एल पी, रॉक वेले डेलीकोपरखैरणे : व्हिक्टोरीया हॉटेल, रसोई फाईन, डाईन, सद्गुरू हॉटेल, बिर्याणी दरबार, फ्रेंड सर्कल ज्युस सेंटर, सहजानंद स्वीट्स, झामा स्वीट्स, कॅफे कॉफी डे, अयंगार बेकरी, हॉट चीप्स सानपाडा : द बेक शॉप, बेंगलोर अयंगार बेकरी, के पी के फायस्टार, इडली मी, सब वे (टेंडर फूड्स), हॉटेल बालाजी, बिकानेर स्वीट्सबेलापूर : रिबन्स अँड बलुन्स केक शॉप, अमालगमेंटेड क्वीन कॉफी ट्रेडिंग कंपनी, इन्स्पिरेशन फूड्स, बर्डिस केक शॉप, जे. व्ही. व्ही. हॉस्पिटॅलिटी, रॉयल अरेबिया, चेतक स्वीट्स, शिवशक्ती फास्ट फूड अँड ज्युस कॉर्नर, लीला केक शॉप, माँजिनीज, नित्यानंद फॅमिली रेस्टॉरंट, बेंगलोर अय्यंगार बेकरी