शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

दिघ्यात दोन इमारतींना सील

By admin | Updated: March 1, 2017 05:40 IST

दिघ्यातील चारपैकी दुर्गामाता आणि अवधूत छाया या दोन इमारती रिकाम्या करून, त्या सिडकोच्या ताब्यात दिल्या.

नवी मुंबई : मंगळवारी कोर्ट रिसिव्हरने कडेकोट पोलीस बंदोबस्तात दिघ्यातील चारपैकी दुर्गामाता आणि अवधूत छाया या दोन इमारती रिकाम्या करून, त्या सिडकोच्या ताब्यात दिल्या. सिडकोने या इमारतींना सील ठोकले असून उर्वरित दोन इमारतींवर पुढील दोन दिवसांत कारवाई होण्याचे संकेत सिडकोच्या संबंधित विभागाने दिले आहेत. दरम्यान, या कारवाईला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला; परंतु उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने कोर्ट रिसिव्हरने दोन इमारती रिकाम्या करून त्यांचा ताबा सिडकोला दिला. दिघा परिसरातील ९९ बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यातील बहुतांशी इमारती एमआयडीसी व सिडकोच्या जागेवर आहेत. गेल्या दीड वर्षापासून या इमारतींवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत केरू प्लाझा, शिवराम आणि पार्वती या तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अंबिका व कमलाकर या दोन इमारतींना सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली. सोमवारी उच्च न्यायालयाने अमृतधाम, अवधूत छाया, दुर्गामाता प्लाझा आणि दत्तकृपा या चार इमारतींची याचिका फेटाळली. तसेच या इमारती तातडीने रिकाम्या करून पुढील कारवाईसाठी त्या सिडकोच्या सुपुर्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी कोर्ट रिसिव्हरने कडेकोट पोलीस बंदोबस्तात या चार इमारती रिकाम्या करण्याची कारवाई सुरू केली. त्याला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला. सध्या शाळा आणि महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू आहेत. बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे थोडा वेळ द्यावा, अशी विनंती रहिवाशांनी केली; परंतु न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत कोर्ट रिसिव्हरने चारपैकी अवधूत छाया आणि दुर्गामाता प्लाझा या दोन इमारती रिकाम्या करून त्या सिडकोच्या ताब्यात दिल्या. (प्रतिनिधी)।महिला पत्रकारासह कॅमेरामनला मारहाणदिघा येथील अमृतधाम इमारतीवर जप्तीची कारवाई सुरू होती. या वेळी लगतच्या सिद्धिविनायक इमारतीच्या छतावरून वृत्तवाहिनीचे कॅमेरामन संदीप भारती हे चित्रीकरण करत होते. या वेळी महिला पत्रकार स्वाती नाईक याही त्या ठिकाणी होत्या. त्यांना पाहताच कारवाई सुरू असलेल्या इमारतीमधील रहिवाशांच्या जमावाने त्यांच्या दिशेने दगडफेक करत भ्याड हल्ला केला. त्यांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी नाईक व भारती यांनी त्याच इमारतीमधील एका घराचा आसरा घेतला; परंतु ते लपलेल्या घराची माहिती मिळताच जमावाने त्या घराच्या दरवाजावर लाथा मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांना आसरा देणाऱ्या त्या कुटुंबीयाने भीतीपोटी दरवाजा उघडला असता, जमावाने घरात घुसून सामानाची तोडफोड केली. तसेच संदीप भारती व स्वाती नाईक यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. अखेर काही सुज्ञ नागरिकांनी केलेल्या मध्यस्थीनंतर दोन्ही पत्रकारांची जमावाच्या तावडीतून सुटका झाली. मात्र, या घटनेत दोघेही जखमी झाले असून भारती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रबाळे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ।रहिवाशांनी घेतला मंदिरात आश्रयमंगळवारपासून इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. यातच दिघ्यातील दुर्गामाता प्लाझा आणि अवधूत छाया या दोन इमारतींतील रहिवाशांना बेघर व्हावे लागले.त्यामुळे या इमारतींतील अनेक रहिवाशांनी शेजारच्या दुर्गामाता मंदिराचा आश्रय घेतला. ऐन परीक्षेच्या काळात बेघर होण्याची पाळी आल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.