शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘सी-प्लेन’ पहिल्यांदा नागपुरात उडणार

By admin | Updated: June 16, 2017 01:10 IST

विदर्भातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) नागपूर येथे सी-प्लेन सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महेश चेमटे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विदर्भातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) नागपूर येथे सी-प्लेन सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाजनको आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून नागपूर-ताडोबा आणि नागपूर-शेगाव येथील जलाशयात ‘सी-प्लेन’ सुविधा सुरू करण्यात येईल. या कामासाठी एमएमबीने इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. केंद्राच्या पर्यटनवाढीला पोषक ठरणाऱ्या उपक्रमांतर्गत राज्य सरकारने वर्षभरापूर्वी ‘सी-प्लेन’ योजना मांडली होती. त्यामध्ये पहिल्यांदा मुंबईत हा प्रकल्प राबविण्याचा विचार होता, मात्र आता नागपुरातून त्याचा ‘श्रीगणेशा’ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नागपुरातील जलाशय, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, ताडोबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे या ‘सी-प्लेन’मुळे आकर्षण वाढेल, त्यामुळे तेथील पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. केंद्र सरकारच्या जहाज बांधणी मंत्रालयाने सागरमाला उपक्रमांतर्गत नागपूर-ताडोबा, शेगाव येथे सी-प्लेन सुरू करण्याचा विचार मांडला होता. त्या धर्तीवर एमएमबीने नागपूर सुधार प्रन्यास आणि महाजनकोच्या माध्यमातून सी-प्लेन सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाजनकोचे कोराडी येथे थर्मल पॉवर स्टेशन आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना सी-प्लेनचा थरार अनुभवता येईल. मध्यवर्ती हब बनू पाहणाऱ्या नागपूरच्या शिरपेचात सी-प्लेनमुळे मानाचा तुरा रोवला जाणार आहे.नागपूर येथे पर्यटकांच्या आकर्षणासाठी सी-प्लेन सुविधा सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला कोराडी (थर्मल पॉवर स्टेशन) येथील सी-प्लेन सुविधेसाठी निविदादेखील मागविल्या आहेत. त्याला प्रतिसाद आला आहे. नागपूरनंतर दुसऱ्या टप्प्यात मुंबईत बेलापूर आणि वांद्रे येथेदेखील ‘सी-प्लेन’ सेवा कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.- अतुल पाटणे (मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ)