शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

नोटा बदलीच्या रॅकेटची व्याप्ती मोठी

By admin | Updated: December 21, 2016 23:22 IST

कोल्हापुरात व्यापाऱ्यांच्या घरांवर छापे : रॅकेट उखडून टाका : नांगरे-पाटील यांचे आदेश

कोल्हापूर : जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलून देणारे रॅकेट मोठे आहे. व्यापाऱ्यांबरोबर काही बँकांचे कर्मचारी यामध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे. या रॅकेटचे मूळ उखडून टाका, असे आदेश कोल्हापूर-सातारा पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ६० लाख रुपयांच्या नव्या चलनातील नोटा देण्यासाठी प्रयत्नात असणाऱ्या ‘त्या’ राजारामपुरीतील दोघा व्यापाऱ्यांच्या घरांवर मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास छापे टाकले. ही कारवाई सातारा पोलिसांनी केल्याचे समजते. आणखी काही रक्कम सापडते का, याची खातरजमा करण्यासाठी घरातील कोपरान्कोपरा शोधून काढला. संशयित व्यापारी सागर दत्तात्रय आरडे (वय ४५, रा. राजारामपुरी १० वी गल्ली) व भगवान बिराप्पा भोपळे (५०, रा. राजारामपुरी १३ वी गल्ली) हे सिमेंट विक्रीचे होलसेल व्यापारी आहेत. दोन-चार तास बँकेच्या रांगेत उभे राहून दोन हजार रुपयांच्या नोटेवर लोकांना समाधान मानावे लागते. अशा गंभीर परिस्थितीत या व्यापाऱ्यांकडे नवीन चलनातील ६० लाख रुपये आले कोठून? कोणत्या बँकेने त्यांना पैसे दिले? यासंबंधीची सातारा पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्यासह आठ ते दहा व्यापाऱ्यांची ही रक्कम असल्याचे तपासात पुढे आले आहे. या नोटांवरील सीरियल नंबर एकसारखे नसल्याने त्या विविध बँकांतून काढल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांनाही त्यांनी हाताशी घेतले आहे. या बँका कोणत्या आहेत? ते रक्कम कोणाला देणार होते? याची संपूर्ण माहिती पोलिस घेत असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या दोघांकडे मोठी रक्कम असल्याचे ऐकून नातेवाइकांनाही धक्का बसला. पोलिसांनी दोघांच्याही पत्नी, मुलांकडे पैशांसंबंधी विचारणा केली. मात्र, त्यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. या दोघांच्या बँक खात्याची माहिती पोलिसांनी घेतली आहे. त्यांच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून अनेक बड्या व्यापाऱ्यांची नावे पुढे आली आहेत. त्याबाबत गोपनीयता पाळली आहे. प्रसिद्ध बँकाही पोलिस रेकॉर्डवर आल्या आहेत. सातारा आयकर विभाग व पोलिस संयुक्त तपास करीत आहेत. दोघांना अटक झाल्यापासून बुधवारी दिवसभर त्यांच्या पै-पाहुण्यांची घराकडे गर्दी वाढली होती. व्यापाऱ्यांची ओळख...सागर आरडे याचा राजारामपुरी दहाव्या गल्लीत, तवनाप्पा पाटणे हायस्कूलच्या शेजारी तीन मजली आलिशान बंगला आहे. बंगल्याच्या सुरुवातीस त्याचे सिमेंट विक्रीचे ओम शांती एजन्सी कार्यालय आहे. त्याचा मित्र भगवान भोपळे याचे राजारामपुरी १३ व्या गल्लीमध्ये प्रशस्त ‘प्रभूछाया’ नावाचे जुने घर आहे. याठिकाणी अपार्टमेंट बांधण्याचे त्याचे नियोजन आहे. बाजारभावानुसार या जागेची करोडो रुपये किंमत आहे. तो सुरुवातीला बकऱ्यांच्या चमडी विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्यानंतर मित्र आरडे याच्याकडून सिमेंटची एजन्सी घेऊन जुन्या घरातील दुकानगाळ्यात राज ट्रेडर्स नावाचे कार्यालय सुरू केले. गेल्या दीड वर्षापासून तो याच परिसरात आय. ए. सांगावकर यांच्या घरी भाड्याने राहतो. रोकड आयकर विभागाकडे; दोघांची सशर्त सुटकासातारा : तीस टक्के कमिशन घेऊन जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा देणाऱ्या रॅकेटमधील तिघांकडून जप्त केलेली साठ लाखांची रोकड बुधवारी आयकर विभागाने ताब्यात घेतली. सविस्तर चौकशीचा अहवाल हाती आल्यानंतरच त्या संशयितांवर ‘मनी लॉड्रिंग’चा गुन्हा दाखल होऊ शकतो.संबंधित तिघा संशयितांना कोल्हापूर येथे हजेरी लावण्याच्या अटीवर सोडण्यात आले असून, एवढी मोठी रक्कम कोठून आली, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये कारमधून रक्कम घेऊन आलेल्या सागर दत्तात्रय आरडे (वय ४५), भगवान बिराप्पा भोपळे (५०, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), उमेश मधुकर कांबळे (४८, रा. कोेळे, ता. कऱ्हाड) यांना मंगळवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली होती. त्यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या तीन हजार नोटा असे साठ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांनी आयकर विभागाला कळविल्यानंतर बुधवारी दुपारी आयकर विभागाने सर्व रक्कम आपल्या ताब्यात घेतली. तिघा संशयितांना कोल्हापूर येथे नेण्यात आले. जोपर्यंत ही रक्कम नेमकी कोठून आली. हे पुढे येत नाही तोपर्यंत त्यांना तेथील पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे.