शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई बैठकीत अधिकारी व्हॉटसअॅपवर पाहत होते आक्षेपार्ह फोटो

By admin | Updated: April 22, 2017 20:56 IST

सभागृहात पाणी प्रश्नावर अधिका-यांना फैलावर घेत असताना दुसरीकडे अन्य अधिकारी सोशल साईटस पाहण्यात मग्न असल्याचे धक्कादायक प्रकार कॅमे-यात कैद झाले.

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 22 - पाणी टंचाईच्या प्रश्नावर पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा परिषदेत शनिवारी बोलावलेल्या बैठकीत सदस्य पोटतिडकीने प्रश्न मांडत असताना ‘म्हैसाळ’चे अधिकारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता, कृषी अधिकारी यांच्यासह डझनभर अधिकारी फेसबुक, व्हॉटस्-अ‍ॅप, मोबाईलवर मग्न होते. दरम्यान, बैठकीत सोशल साईटवर व्यस्त असणा-या अधिका-यांवर कारवाईचे संकेत खोत यांनी दिले.
 
जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज पूर्व भागामध्ये पाणी टंचाई आहे. शिराळा तालुक्यातील काही गावांनाही टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील शंभर गावे, ३२० वाड्या-वस्त्या पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थ भटकंती करीत आहेत. या प्रश्नावर पाणीपुरवठा राज्यमंत्री खोत यांनी जिल्हा परिषदेत आढावा बैठक बोलावली होती. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती जीव तोडून हा प्रश्न मांडत होते. 
 
राज्यमंत्री खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुमनताई पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख प्रश्न जाणून घेत होते. दुसºया बाजूला म्हैसाळ पाणी व्यवस्थापन विभागाचे जबाबदार अधिकारी स्वत: दुष्काळी भागातील असतानाही फेसबुक पाहण्यामध्ये मग्न होते. महावितरणचे कार्यकारी अभियंता, कृषी विभागाचे अधिकारी, काही गटविकास अधिकारी, तहसीलदारही यास अपवाद नव्हते.
 
काहीजण व्हॉटस्-अ‍ॅप आणि अन्य सोशल साईट पाहण्यात गुंग होते. सभागृहात पाणी प्रश्नावर अधिका-यांना फैलावर घेत असताना दुसरीकडे अन्य अधिकारी सोशल साईटस् पाहण्यात मग्न असल्याचे धक्कादायक प्रकार कॅमे-यात चित्रीत होत होते, तरीही अधिका-यांना त्याचे भान नव्हते. हे अधिकारी दुष्काळाची समस्या कशी सोडवतील, असा प्रश्न आमदार नाईक, आ. जगताप यांनी उपस्थित केला.
दरम्यान, टंचाई बैठकीत अधिकारी फेसबुक व अन्य सोशल साईटस पाहण्यात मग्न असल्याबद्दल सदाभाऊ खोत यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, याबाबतचे चित्रीकरण घेऊन दोषी, बेजबाबदार अधिकाºयांवर शासन निश्चित कारवाई करेल.