शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रवाशांच्या सवलतींना कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 05:36 IST

एसटीतील प्रवाशांच्या सवलतींना कात्री लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबई : एसटी महामंडळाकडून प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात. या सवलती मूल्यांमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडतो. हा बोजा कमी व्हावा आणि यामध्ये समानता यावी, यासाठी काही बदल केले जाणार आहेत. हे बदल करताना एसटीतील प्रवाशांच्या सवलतींना कात्री लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी या संदर्भात सवलत मूल्य आढावा समितीकडून अतिरिक्त मुख्य सचिवांसमोर सादरीकरण करण्यात आले. एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध आणि अपंग, स्वातंत्र्यसैनिक यांसह २४ प्रकारच्या विविध सवलती दिल्या जातात. या सवलती दिल्यामुळे महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडतो. सवलती मूल्यांमुळे एसटीवर वर्षाला १,४00 कोटींचा बोजा पडतो. या सवलतींपोटीची काही रक्कम राज्य शासनाकडून महामंडळाला प्रत्येक वर्षी दिली जाते. मात्र, ती रक्कम पूर्ण मिळत नसल्याने, सवलती देताना महामंडळाला मोठे नुकसानही सोसावे लागते. एकूणच यामध्ये समानता यावी आणि सवलत मूल्यांमुळे पडणारे आर्थिक ओझे कमी व्हावे, यासाठी त्याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सवलत मूल्य आढावा समिती काही महिन्यांपूर्वी नेमण्यात आली आणि शासनाच्या जवळपास विविध खात्यांतील १९ जणांची यावर नियुक्ती केली. या समितीचे अध्यक्ष हे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकही आहेत. एक महिन्यांपूर्वी सवलत मूल्यांबाबतीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. हा अहवाल सादर केल्यानंतर अखेर दोन दिवसांपूर्वी अतिरिक्त मुख्य सचिवांसमोर त्याचे सादरीकरण करण्यात आले. लवकरच हा अहवाल अर्थ खाते आणि त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला जाईल. सवलत मूल्यांमध्ये समानता आणतानाच, प्रवाशांच्या सवलतींत काही बदल करण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. यात सवलत मूल्यांना कात्रीही लागेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ही कात्री लागल्यास प्रवासी संख्या कमी होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. सवलत मूल्य हे एकाच छत्राखाली आणताना एकखिडकी योजनाही आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विविध खात्यांकडून रक्कम ही थेट अर्थ विभागाकडे जमा केली जाईल आणि त्यानंतर ती एसटी महामंडळाला मिळेल. (प्रतिनिधी)>तिसरी समितीसवलत मूल्यांमुळे एसटीला आार्थिक बोजा पडत असल्याने, त्याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला व २00५ साली एक समिती नेमण्यात आली. मात्र, त्यानंतर काहीएक हालचाली झाल्या नाहीत. २0११ मध्ये पुन्हा एकदा समिती नेमण्यात आली, परंतु त्यानंतरही सवलत मूल्यांवर निर्णय न झाल्याने, अखेर पुन्हा एकदा आढावा समिती नेमण्यात आली आहे.