शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

समुद्राच्या तळासह लाटांचाही शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 05:13 IST

मुंबई : महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. त्यानुसार सर्व मंजुरींचा अडथळा पार ...

मुंबई : महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. त्यानुसार सर्व मंजुरींचा अडथळा पार पडल्यानंतर महापालिकेने कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले.

समुद्रकिनाऱ्यालगत बांधण्यात येणारा देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच मार्ग असल्याने समुद्र तळ, किनाºयाची उंच-सखलता आणि लाटांचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या मदतीने १ नोव्हेंबरपासून या कामाला सुरुवात होईल.

दक्षिण मुंबईतील ‘शामलदास गांधी मार्ग’ ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’ यांना जोडणारा ९.९८ कि.मी. लांबीचा हा ‘सागरी किनारा रस्ता’ (कोस्टल रोड) असेल. या प्रकल्पावर गेल्या १५ दिवसांत संबंधित ठेकेदार व सल्लागारांनी केलेली कार्यवाही व पुढील नियोजनाचा आढावाही घेण्यात आला.कोस्टल रोडसंदर्भात पंधरवड्यात करण्यात आलेल्या या कामांचा सविस्तर आढावा मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी एका विशेष बैठकीत नुकताच घेतला आहे. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) संजय सेठी, किनारी रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचीवाल यांच्यासह संबंधित अधिकारी, प्रकल्प सल्लागार, ठेकेदार कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

९० दिवसांच्या आत रेखाचित्र सादर करावे लागणार‘शामलदास गांधी मार्ग’ ते ‘बडोदा पॅलेस’पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे कंत्राट हे ‘एल अ‍ॅण्ड टी’ कंपनीला देण्यात आले आहे. याबाबतचे कार्यादेश संबंधित कंपनीला २९ सप्टेंबरला देण्यात आले. तर ‘बडोदा पॅलेस’ ते ‘वांद्रे वरळी सी-लिंक’ दरम्यानच्या रस्त्याच्या बांधकामाचे कंत्राट एच.सी.सी. व एच.डी.सी. या संयुक्त कंपनीला देण्यात आले असून त्यांना १ आॅक्टोबरला कार्यादेश देण्यात आले. दोन्ही कंपन्यांना कार्यादेश दिल्यापासून ९० दिवसांच्या आत कोस्टल रोडचे प्राथमिक रेखाचित्र सादर करावे लागणार आहे.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्ग