शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

थर्माकोलवर शास्त्रोक्त प्रक्रिया

By admin | Updated: June 13, 2016 03:56 IST

थर्माकोल वेगळे करून यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली.

ठाणे : ठाणे महापालिकेने कचऱ्याचे विघटन करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले असतानाच आता घनकचऱ्यातून थर्माकोल वेगळे करून यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन ७०० मेट्रीक टन कचरा जमा होतो. यामधून ओला व सुका कचरा वेगळा करून सुक्या कचऱ्याची पर्यावरण संवर्धनशील पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रस्तावित आहे. ठाणे शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यातील थर्माकोलवर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रि या करून पुनर्वापर करण्याकरिता वार्षिक सरासरी १ टन प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारणी करून १० वर्षे चालवण्याबाबतचा प्रस्ताव जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.घनकचऱ्यातील थर्माकोलवरील पुनर्प्रक्रिया व पुनर्वापर, त्याचे व्यवस्थापन करणे, थर्माकोल कचरा डम्पिंग ग्राउंडवर नेण्यासाठीची यांत्रिक व्यवस्था व मनुष्यबळाच्या खर्चाची बचत करणे, थर्माकोलचा कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये पडून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे आदी वैशिष्ट्ये या प्रकल्पाची असून अशा प्रकारचा प्रकल्प राबवणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका असल्याचे महापौरांनी सांगितले. हा प्रकल्प महापालिका कार्यक्षेत्रात कार्यान्वित केल्यानंतर नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याची जागृती होईल. थर्माकोल व तत्सम पदार्थांवर प्रक्रिया केल्याने शहरातील नद्या, नाले तुंबण्याचे प्रमाण कमी होईल. थर्माकोलमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित राहील, डम्पिंग ग्राउंडपर्यंत वाहतुकीचा खर्च व मनुष्यबळ यामध्ये बचत होईल. या प्रकल्पाचा कोणताही भांडवली व महसुली भार महापालिकेवर पडणार नाही. शिवाय, या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेपैकी काही रक्कम महापालिकेस महसूल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील प्रदूषणाचे प्रमाण काही प्रमाणात कमी करण्यासाठी निश्चित मदत होईल. त्यामुळे भविष्यातदेखील नवनवीन तंत्रज्ञान वापरून अशा प्रकारचे प्रकल्प महापालिका कार्यक्षेत्रात राबवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.