शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान दिनामागचं गुपित!

By admin | Updated: February 28, 2017 06:39 IST

भारताला विज्ञानाचं पहिलं नोबेल मिळवून देण्याचा मान डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा.

- पवन देशपांडेभारताला विज्ञानाचं पहिलं नोबेल मिळवून देण्याचा मान डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा. एखाद्या पारदर्शक पदार्थामधून प्रकाश जाताना त्याचे काय काय होते, याचा शोध डॉ. रामन यांनी लावला तो २८ फेब्रुवारीला. हा शोध म्हणजे रामन इफेक्ट. त्याचा सन्मान नोबेलने झाला अन् तेव्हापासून हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन बनला.डॉ. रामन यांनी शोध लावला ते वर्ष लीप वर्ष होतं. म्हणजे त्यांचा शोध जर एक दिवस उशिरा लागला असता (२९ फेब्रुवारीला) तर हा दिवस दर चार वर्षांनी साजरा करावा लागला असता. हा विज्ञान दिन साजरा व्हावा यासाठी एका द्रष्ट्या शास्त्रज्ञानेच पुढाकार घेतला. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर १९८६ मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यावेळी त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी अनेक योजना पुढे आणल्या. त्या राबवल्याही. देशभरात विज्ञानाचे जाळे पसरावे आणि त्याची गोडी सर्वांना लागावी, असा विचार करून डॉ. गोवारीकर यांनी विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी रामन इफेक्ट उदयास आलेल्या त्या २८ फेब्रुवारी या दिवसाची निवड केली. पहिला विज्ञान दिन १९८७ साली साजरा केला गेला. सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या विज्ञान दिनाच्या व्याख्यानाला डॉ. जयंत नारळीकर यांना आमंत्रित केले गेले होते. आता यावर्षी लोकमतच्या वतीने देण्यात येणाऱ्या खास लेखांमध्येही त्यांचा लेख आहे, हे विशेष. (शैक्षणिक धोरणातच बदल व्हावा)(अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा)नोबेलच्या रकमेतून हिऱ्यांची खरेदीडॉ. रामन यांना नोबेल पुरस्कारावेळी जी रक्कम मिळाली त्याचा वापर त्यांनी हिऱ्यांची खरेदी करण्यासाठी केला. अर्थात हिऱ्यांचा त्यांना शौक नव्हता, तर त्यांना त्यावर संशोधन करायचे होते. स्वत:साठी किंवा कुटुंबासाठी पैसे खर्च करण्याऐवजी त्यांनी वेगवेगळ्या आकाराचे आणि दर्जाचे हिरे खरेदी केले. हिऱ्यांच्या प्रकाशकीय गुणधर्माचा आणि आंतररचनांचा अभ्यास त्यांना करायचा होता. भविष्यात त्यांनी तो केलाही.