शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शून्य कचरा मोहिमेत शाळाही सहभागी होणार

By admin | Updated: June 30, 2016 03:16 IST

महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे.

ठाणे : महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. परंतु, हे अभियान न राहता ही स्वच्छता चळवळ व्हावी व यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही सहभाग महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास महापौर संजय मोरे यांनी बुधवारी गडकरी रंगायतन येथे झालेल्या मार्गदर्शनपर बैठकीत व्यक्त केला.महानगरपालिकेने ठाणे महापौर पुरस्कार परिसर सुधारणा योजना जाहीर करून ती गृहसंकुले व झोपडपट्टी अशा दोन गटांत घेण्याचे निश्चित केले आहे. ती फक्त १ जुलैपुरतीच मर्यादित न राहता कायमस्वरूपी चळवळ निर्माण व्हावी, यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चितच मोलाचा ठरू शकतो. यासाठी ठाणे महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच महापालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित, मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक गडकरी रंगायतन येथे आयोजित केली होती. या बैठकीत काँग्रेसचे गटनेते राजन किणे, आरोग्य समिती सभापती पूजा वाघ, शिक्षण समिती सभापती प्रभा बोरीटकर,अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब, उपायुक्त संजय हेरवाडे, संदीप माळवी, मनीष जोशी, आर निसर्ग फाउंडेशनच्या लता घनश्यामनानी, डॉ. केळशीकर व जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्रा. नीलिमा कुलकर्णी व ६०० मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)विद्यार्थी हा या देशाची भावी पिढी असून शालेय वयातच मुलांना घनकचरा व्यवस्थापन, पर्यायाने स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन देता यावे तसेच वृक्षलागवड, शून्य कचरा मोहीम आदींची माहिती देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी दिलेल्या शिक्षणापेक्षा गुरूंनी दिलेल्या शिक्षणानुसार विद्यार्थी घडत असतो व त्यानुसारच वर्तणूक करत असतो. त्यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच दैनंदिन सवयी लागाव्यात, यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही महापौरांनी केले. महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या परिसर सुशोभीकरण योजनेत सहभागी व्हावे, वृक्षलागवड, शून्य कचरा मोहीम, धोकादायक इमारतीसंदर्भात घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.