शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शाळांनी वह्या, पुस्तकांची विक्री करणे थांबवावे!

By admin | Updated: April 1, 2017 04:05 IST

शाळेच्या परीक्षा संपल्या, निकाल लागल्यावरही पालकांना शाळेच्या खेपा माराव्या लागतात. एकच कारण असते की

मुंबई : शाळेच्या परीक्षा संपल्या, निकाल लागल्यावरही पालकांना शाळेच्या खेपा माराव्या लागतात. एकच कारण असते की, पुढच्या वर्षीच्या वह्या, पुस्तके आणि अन्य शैक्षणिक साहित्य हे शाळेतूनच घेणे विद्यार्थ्यांना अनिवार्य केलेले असते. खरे तर महाराष्ट्र बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई अशा कोणत्याही शाळांना वह्या, पुस्तके आणि अन्य शाळेचे साहित्य विकण्याची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली आहे. तरीही शाळा खुलेआमपणे विक्री करून पालकांना लुबाडतात. शाळांनी हे थांबवावे, अशी मागणी करणारे पत्र बॉम्बे बुकसेलर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्स असोसिएशनने शिक्षणमंत्री आणि शाळांना पाठवले आहे. नियमांनुसार कोणतीही शाळा त्यांच्या कोणत्याही साहित्याची, पुस्तकांची विक्री करू शकत नाही. हा नियम सर्व शाळांना लागू होतो. तिसऱ्या व्यक्तीला कंत्राट देऊनही शाळेच्या आवारात विक्री करण्यास मनाई आहे. तरीही या नियमाची पायमल्ली होताना दिसते आहे. याचबरोबर शाळा कोणत्याही एका दुकानदाराचे अथवा डिलरचे नाव पालकांना सांगू शकत नाही. तरीही शाळांमध्ये हे प्रकार घडतात. पालकांना पुस्तके, वह्या आणि अन्य शैक्षणिक साहित्य घेण्याचा अधिकार असूनही त्यांना नाकारला जातो. या गोष्टी थांबाव्यात म्हणून शाळांना आणि शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. (प्रतिनिधी)हवे तसे दर आकारणे थांबवणे गरजेचेशाळांमधून विकल्या जाणाऱ्या वह्या-पुस्तक, गणवेशासाठी पालकांकडून अधिक पैसे आकारले जातात. या वस्तूंवर किमती नसतात. मुद्दामहून वह्या, पुस्तकांचे आकार अर्धा किंवा एक इंच जास्त सांगितले जातात. सामान्य आकाराच्या वह्या सांगितल्या जात नाहीत. त्यामुळे पालकांना त्या बाजारात उपलब्ध होत नाहीत. शाळा यासाठी कोणताही कर भरत नाहीत. त्यांची नोंदणी नसते. त्यामुळे त्यांना हवे तसे दर आकारतात. हे थांबणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर कारवाई केली पाहिजे. निकालाच्या दिवशी शाळेने साहित्याची यादी देणे अपेक्षित असल्याचे शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते जयंत जैन यांनी सांगितले.