शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये होते शालेय साहित्याची विक्री

By admin | Updated: June 6, 2017 04:07 IST

शालेय साहित्याची विक्री शाळांमध्ये करू नये, असे परिपत्रक राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने काढले आहे.

जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शालेय साहित्याची विक्री शाळांमध्ये करू नये, असे परिपत्रक राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने काढले आहे. असे असतानाही शाळा सर्रासपणे शालेय साहित्याची विक्री करत आहेत. त्यामुळे शालेय साहित्य विकणाऱ्या दुकानदारांचे नुकसान होत आहे. सरकारी परिपत्रकाची शाळांकडून पायमल्ली होत असताना सरकारी यंत्रणा त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. राज्य सरकारच्या बोर्डाच्या कल्याण-डोंबिवलीत १०२ शाळा आहेत. डोंबिवलीत सीबीएसई बोर्डाच्या आठ, आयसीएसई बोर्डाच्या पाच आणि आयजीसीएससी बोर्डाच्या तीन शाळा आहेत. या शाळा १५ जूनपासून सुरू होणार असल्याने पुस्तके, वह्या, कंपासपेटी, वॉटरबॅग तसेच रेनकोट, छत्र्या आदी वस्तूंच्या खरेदीसाठी पालकांची बाजारात गर्दी होत आहे. मात्र, दिल्ली बोर्डाच्या तसेच कॉन्व्हेंट, खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वह्या, पुस्तके, व्यवसाय आदी शालेय साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती पालकांवर करत आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरांतील शालेय साहित्य विकणाऱ्या २०० हून अधिक दुकानदारांचे नुकसान होत आहे. साहित्याचा दर बाजारापेक्षा १० ते २० टक्के जादा आहे. सरकार शाळेत होणाऱ्या शालेय साहित्यविक्रीवर बंदी घालत नाही. ही विक्री रोखण्यासाठी सरकारकडे यंत्रणाच नसल्याचे सूत्रांनी सांगितले.दप्तरापासून सर्व शालेय साहित्य शाळांकडून पुरवले जात असल्याने साहित्यविक्रेत्यांचा बाजार बसला आहे. सरकारकडून ज्या डिलरना पुस्तके सवलतीच्या दरात विक्रीसाठी पाठवली जातात. त्या विक्रेत्यांनाही १० ते १५ टक्केच सवलत मिळते. जास्त नफा त्यांना मिळत नाही. त्यात शालेय साहित्यही शाळांमधून देत असल्याचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे. डिलर ठरलेले असल्याने अन्य व्यावसायिक त्यात हात घालत नाही. सरकारकडून धूळफेकबॉम्बे बुक सेल्स अ‍ॅण्ड पब्लिकेशन या संस्थेने शाळांमधून शालेय साहित्यखरेदीस विरोध केला आहे. त्याची दखल अद्याप सरकारकडून घेतली जात नाही. कारवाई करण्यास सरकारकडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे केवळ परिपत्रक काढून शालेय साहित्यविक्रेत्यांच्या डोळ्यांत सरकारने धूळफेक केली आहे, असा मुद्दा विक्रेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.