शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी पटामुळे शाळा श्रीमंत

By admin | Updated: June 29, 2016 01:23 IST

आम्हाला पटाने श्रीमंत असलेल्या शाळेत काम करायला मिळणार,’ असा आनंद शाळेत बदली होऊन आलेल्या नवीन शिक्षकांनी व्यक्त केला.

चाकण : ‘१,०६३ विद्यार्थी पटसंख्या असलेली खराबवाडीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही ग्रामीण भागातील पटाने मोठी असलेली राज्यातील पहिली शाळा असल्याने आम्हाला पटाने श्रीमंत असलेल्या शाळेत काम करायला मिळणार,’ असा आनंद शाळेत बदली होऊन आलेल्या नवीन शिक्षकांनी व्यक्त केला. शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी जड अंत:करणाने निरोप दिला. बाहेरील शाळेतून बदली होऊन आलेल्या शिक्षकांचा स्वागत समारंभ व येथील बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ शाळेत झाला.शाळा समितीचा सदस्या मंगल देवकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. समिती सदस्या सारिका खराबी व मंगल देवकर, मुख्याध्यापक हरिभाऊ खोडदे, निवृत्त मुख्याध्यापिका पुष्पलता पिंगळे व शिक्षक यांच्या हस्ते सर्व नूतन शिक्षकांचे शाल, श्रीफल व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर, बदली झालेल्या शिक्षकांना सर्व शिक्षकांच्या वतीने पैठणी, चोळी व पोशाख देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षिका नंदा पवार, नीता जाधव, उज्ज्वला अष्टगी, मनीषा ढगे, रेणुका वसे व शिक्षक महेश पाटील यांची बदली झाल्याने कृतज्ञता सोहळ्यात त्यांना निरोप देण्यात आला. (वार्ताहर)>पायपिटीमुळे पट वाढलाविद्यार्थी पटासाठी शिक्षकांना पायपीट करावी लागते, तर पटासाठी अपात्र झालेले शिक्षक आम्ही पाहिलेले असून खराबवाडीची शाळा ही तर पटाची श्रीमंत शाळा आहे, असे विचार नवीन शिक्षकांनी व्यक्त केले. रोहिणी गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री लोहार, रेखा सपकाळ, रूपाली डुंबरे, तानाजी खैरे, संतोष भुते, दादासाहेब खरात, छाया कोल्हे, वसुधा करंडे या नवीन शिक्षकांचे शाळेत जंगी स्वागत करण्यात आले. शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करताना सगळे भावुक झाले होते.