शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

शाळेने चौथीच्या विद्यार्थिनीला ठेवले डांबून

By admin | Updated: January 7, 2017 02:42 IST

नवीन पनवेल सेक्टर ७ येथील सेंट जोसेफ हायस्कूलमधील चौथीच्या विद्यार्थिनीला वर्गात डांबून ठेवल्याप्रकरणी पालक आक्रमक झाले

पनवेल : नवीन पनवेल सेक्टर ७ येथील सेंट जोसेफ हायस्कूलमधील चौथीच्या विद्यार्थिनीला वर्गात डांबून ठेवल्याप्रकरणी पालक आक्रमक झाले असून, आंदोलनाच्या तयारीत आहेत. पालकांनी शुक्रवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करत, शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.सेंट जोसेफ शाळा अनेक प्रकरणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. फीवाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शाळेला एक महिन्याचा अवधी देण्यात आलेला होता. मात्र, एक महिना उलटून गेला तरी शाळेवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. शाळेची फी न भरल्याचा राग मनात ठेवून सेंट जोसेफ हायस्कूलच्या शिक्षिकेने चौथीतील तृषा हिला वर्गात डांबून ठेवले होते. यावेळी इतर विद्यार्थ्यांना शिक्षिकेने लायब्ररीमध्ये जाण्यास सांगितले. तृषाला वर्गात बसण्यास सांगून, लाइट व फॅन बंद करून शिक्षिकेने वर्गखोलीला बाहेरून कडी लावली. तृषाने आईवडिलांना सांगितल्यावर संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. मात्र, वरून आदेश असल्याचे सांगत शाळेने जबाबदारी झटकली. तर हा सारा प्रकार अनावधानाने झाल्याचे शिक्षिकांचे म्हणणे आहे. पालकांनी शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, खांदेश्वर पोलिसांनी शाळेविरोधात केवळ तक्रार दाखल करून घेतल्याने पालक नाराज आहेत. पनवेल पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, माधुरी कुबेरकर यांनी अहवाल तयार करून पाठवणार असल्याचे सांगितले. >विद्यार्थिनीला वर्गखोलीत डांबून ठेवल्याप्रकरणी पोलीस तक्र ार दाखल करण्यात आली आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळेची चौकशी करण्यासाठी सांगितले आहे. शाळेला यापूर्वी एक नोटीस पाठवली आहे. आता दुसरी नोटीस बजावणार आहोत. - शेषराव बडे, जिल्हा शिक्षण अधिकारी>शासनाने फी भरण्यासाठी स्थगिती दिली आहे, तरीही शाळा फी भरण्यासाठी मुलांच्या मागे लागली आहे. फी भरण्यासाठी त्यांच्या वहीवर लिहून दिले जात आहे. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक दिली जात असल्याची तक्रार यावेळी पालकांकडून करण्यात आली.