शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

शाळांच्या परीक्षेतही ‘सैराट झालं जी...’

By admin | Updated: August 11, 2016 03:26 IST

‘सैराट’ मधील परशा-आर्ची ही जोडी केवळ तरुणाईच्या गळ््यातील ताईत बनली नाही, तर शाळकरी मुली-मुलांवरही या जोडीने जादू केली आहे.

पुणे : ‘सैराट’ मधील परशा-आर्ची ही जोडी केवळ तरुणाईच्या गळ््यातील ताईत बनली नाही, तर शाळकरी मुली-मुलांवरही या जोडीने जादू केली आहे. घरात, शाळेच्या आवारात ‘सैराट’ डायलॉग बोलणाऱ्या या पोरांनी आता परीक्षेतही परशा-आर्चीला नेऊन ठेवले आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या पायाभूत चाचणीत एका विद्यार्थ्याने चित्रावरून या दोघांंची गोष्टच लिहिली आहे. शिक्षकांनीही विद्यार्थ्याच्या या कल्पनाशक्तीचे कौतुक करीत पाचपैकी चार गुण दिले आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत मागील वर्षीपासून दुसरी ते आठवीपर्यंतच्या वर्गासाठी पायाभूत चाचणी घेतली जात आहे. या वर्षी दि. २८ व २९ जुलै रोजी ही परीक्षा राज्यभरातील १ कोटी ६० लाख विद्यार्थ्यांनी दिली. विद्यार्थ्यांमधील तर्क, अनुमान, आकलनक्षमतेला वाव देण्याच्या मुख्य उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत अभ्यासक्रम किंवा धड्याखालील एक प्रश्न नसतो. त्यामुळे विविध आकृत्या, चित्र, सारांश, आकडेमोड देऊन विद्यार्थ्यांनी त्यावरून उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. प्रत्येक वर्गाच्या क्षमता त्या वयानुसार निश्चित केलेल्या आहेत. त्याप्रमाणे चाचणीमध्ये प्रश्न विचारले जातात.नुकत्याच झालेल्या या परीक्षेत चौथीच्या वर्गासाठी मराठी विषयाच्या चाचणीत एक चित्र देण्यात आले होते. या चित्रामध्ये एका मुलीसह पाच विद्यार्थी पावसात रस्त्याने जात असल्याचे दाखविले होते. त्यातील एक जण रस्त्यात पडलेला दाखविला असून मुलगी छत्री घेऊन त्याच्या बाजूला उभी आहे, तर अन्य दोघे जण एकाच छत्रीत त्यांच्याजवळून चालले आहे. एक जण एकटाच चाललेला चित्रात दिसतो. हे चित्र पाहून त्यावर गोष्ट लिहिण्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी पाच गुण देण्यात आले होते. एका विद्यार्थ्याने गोष्ट लिहिताना या चित्राला थेट ‘सैराट’मय करून टाकले. खाली पडलेला परशा, त्याच्या शेजारी उभी असलेली आर्ची आणि एका छत्रीत असलेल्या दोघांचे लंगड्या व सलीम असे नामकरण करून टाकले, तर पाचव्या विद्यार्थ्याला ‘स्वराज’ हे काल्पनिक नाव दिले आहे. त्यानंतर परशा व आर्चीमधला काल्पनिक संवाद लिहून गोष्टीचे ‘हॅप्पी एंडिंग’ केले आहे. पायाभूत चाचणीतील गोष्ट...शाळेची घंटी वाजली. शाळा सुटली. परशा, आर्ची, स्वराज, लंगड्या, सलीम ही सर्व जणे निघाली. मधल्या वाटेत आली. जोराचा मुसळधार पाऊस आला. स्वराज एकटाच होता.आर्ची व परशा ही दोघे एका छत्रीत होती. सलीम व लंगड्या एका छत्रीत होती. परशा घसरून पडला.परशा : मला उचला व आर्चीने त्याला उठवले. आर्ची : परशा लागलं आहे का.परशा : हो थोडंसं लागलं.आर्ची : तू घरी जा व कपडे बदलून ये. मी तुला औषध लावते. आर्ची परशाला औषध लावते व सर्व जणे आपापल्या घरी जातात.