शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

...तर १५ जुलैपासून शाळा बेमुदत बंद!

By admin | Updated: May 30, 2016 04:47 IST

१५ जुलैपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा राज्य शिक्षण बचाव निर्धार लढा समितीच्या रविवारच्या मेळाव्यात देण्यात आला.

कोल्हापूर : वेतनेतर अनुदान द्यावे, २० पटसंख्येखालील शाळा बंद करू नयेत, आदी मागण्यांकडे वेळोवेळी लक्ष वेधूनही शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे १५ जुलैपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा राज्य शिक्षण बचाव निर्धार लढा समितीच्या रविवारच्या मेळाव्यात देण्यात आला. समाजातील सर्वच घटकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सोमवारपासून जागृती करणार असल्याचेही समितीने जाहीर केले.विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आतापर्यंतचे सर्वांत अधिक फसवे मंत्री असल्याची टीका केली. त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेऊ नये. जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत शाळांचे कुलूप काढू नये, असेही त्यांनी सांगितले. माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे आपल्या भाषणात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे अप्रत्यक्षरीत्या समर्थन करीत असल्याचे जाणवले. त्यामुळे श्रोत्यांमध्ये काही शिक्षकांनी साळुंखे यांच्या मुद्द्यांवर आक्षेप घेत त्यांचे भाषण रोखल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. (प्रतिनिधी) >आंदोलनाचा कार्यक्रमदि. ३० मे ते १४ जून - लोकप्रतिनिधींना संपर्क. १५ ते ३० जून - राज्यभर मेळावे, जागृती करणे, काळ्या फिती लावून काम करणे. ४ जुलै : एक दिवस शाळा बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयामोर आंदोलन, १५ जुलैपासून - बेमुदत शाळा बंद.>महत्त्वाच्या मागण्या शाळा तेथे मुख्याध्यापक ठेवावेतशिक्षक भरतीस परवानगी द्यावीसन २०१५-१६ च्या संचमान्यतेस स्थगिती द्यावीप्राथमिक शाळांना पाचवी ते आठवीचे वर्ग जोडू नयेतविनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना त्वरित पगार द्याकला-क्रीडा शिक्षकांच्या नियुक्त्या कराव्यातशिक्षकेतर सेवकांची नवीन आकृतिबंध करावाप्राथमिक शाळेमध्ये लिपिक व सेवकांची पदे मान्य करावीत.