शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

स्कूल बसचालकांचा संप मागे

By admin | Updated: April 10, 2017 04:31 IST

स्कूल बस चालकांनी वाढवलेले शुल्क आणि त्यातच एप्रिलमध्ये करण्यात येणाऱ्या संपामुळे पालक अधिकच त्रस्त झाले

मुंबई: स्कूल बस चालकांनी वाढवलेले शुल्क आणि त्यातच एप्रिलमध्ये करण्यात येणाऱ्या संपामुळे पालक अधिकच त्रस्त झाले होते, पण आता संप मागे घेतल्यामुळे पालकांची चिंता मिटलेली असून, विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत पार पडणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने विम्याची रक्कम वाढवल्याचा फटका अन्य वाहनमालकांसह स्कूल बस चालकांनाही बसणार आहे. विम्याच्या हफ्त्यात होणाऱ्या वाढीचा आर्थिक फटक्यामुळे बस मालक त्रस्त झाले होते. त्यामुळे हफ्त्याची रक्कम कमी करा, अन्यथा संपावर जाऊ, अशी मागणी बस मालकांकडून करण्यात आली होती. या संदर्भात झालेल्या बैठकीत इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीने (आयआरडीए) सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र ट्रक टँकर बस वाहतूक महासंघाचे पदाधिकारी आणि स्कूल बसचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत आयआरडीएच्या अधिकाऱ्यांनी विम्याच्या हफ्त्यात केल्या जाणाऱ्या वाढीवर पुनर्विचार केला जाणार असल्याचे आश्वासन दिले. काही दिवसांतच यावर उपाय काढण्यात येईल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे संप करण्याचे काही काळासाठी मागे घेण्यात आल्याचे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. या वर्षी पेट्रोल, डिझेलचे भाव दरवर्षी वाढत आहेत. पार्किंगचा खर्च वाढला आहे. त्यातच स्कूल बसच्या सुरक्षेच्या नियमांमुळे खर्च वाढला आहे. त्यातच विम्याच्या हफ्त्याचा बोजा पडणार असल्यामुळे मालक नाराज होते, पण यावर तोडगा निघणार असल्यामुळे मालकांनी तूर्तास संप मागे घेतल्याचे गर्ग यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)