शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ प्रणाली अजूनही ‘ऑफलाइन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 07:03 IST

तांत्रिक बिघाड : जूनपर्यंत शिक्षकांचे वेतन आॅनलाइन देणे अशक्य

मुंबई : राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन करणारी शालार्थ सॉफ्टवेअर प्रणाली अजूनही ‘आॅफलाइन’ आहे. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त न झाल्याने एप्रिल ते जून २०१९ पर्र्यंतचे पगारही आॅनलाइन देणे अशक्य असल्याने ते आॅफलाइन पद्धतीनेच काढण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे. यासंदर्भात शासन निर्णय शिक्षण विभागाकडून ८ मार्च रोजी जारी करण्यात आला आहे.

ज्या शालार्थ वेतन प्रणालीमधून वेतन देयके अपडेट केली जातात त्या शालार्थ वेतन प्रणालीचे संकेतस्थळच वर्षभरापासून बंद असल्यामुळे शिक्षकांचे वेतन आॅफलाइन देण्यात येत आहे. ही प्रणाली सुरूच न झाल्याने राज्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार आॅफलाइन देण्याबाबतची मुदत आणखी तीन महिने वाढवली आहे. तशा प्रकारचे आदेश राज्याच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी दिले आहेत. शिक्षकांचे जूनपर्यंतचे नियमित व थकीत पगार आॅफलाइन देण्यात येतील. तसेच अर्धवेळ, रजा कालावधीत नियुक्त तसेच तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे नियमित व थकीत वेतनही आॅफलाइन देण्यात येणार आहे.असा आहे शासन नियम१ जुलै व २ जुलैच्या शासन निर्णयान्वये अनुदानासाठी घोषित केलेल्या एकूण ९८ हजार ९७० पात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, १३ मार्च २०१८ च्या शासन निर्णयानुसार केलेल्या वैयक्तिक मान्यता दिलेल्या २७६ शिक्षकांचे तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील पुरवणी मागणीद्वारे मान्य केलेल्या १७१ शिक्षकांचे वेतन आॅफलाइन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर खासगी मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन समितीने दिलेल्या पदांच्या वेतनाचा समावेशही यामध्ये करण्यात आला असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.