शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

साडेतीन लाख अल्पसंख्याक विदयार्थ्यांची शिष्यवृत्ती वांदयात

By admin | Updated: October 20, 2016 16:25 IST

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीत यंदा मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अविनाश साबापुरे

यवतमाळ, दि. २० - अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीत यंदा मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचा फटका राज्यातील तब्बल ३ लाख ८७ हजार १२० विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने यावर पावले न उचलल्यास हे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या रकमेला मूकणार आहेत.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने २००८ पासून प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती सुरू केली आहे. त्यात दरवर्षी विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत (रिनीव्हल) करावी लागते. २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात महाराष्ट्रातील ७ लाख १७ हजार ८९६ विद्यार्थ्यांच्या माहितीचे नूतनीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. यात मुस्लिम समाजातील ४ लाख ७१ हजार १९५ विद्यार्थी, बौद्ध समाजातील २ लाख १२ हजार ४२६, जैन समाजातील १९ हजार ८१८, ख्रिश्चन ९ हजार ८१८, शिख ३ हजार ९९१ आणि फारसी समाजातील ६४८ विद्यार्थी या शैक्षणिक सत्रात शिष्यवृत्तीकरिता पात्र होते.

मात्र, या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यात बऱ्याच जिल्ह्यांच्या पातळीवर ढिसाळपणा झाला. परिणामत: केवळ ३ लाख ३० हजार ७७६ विद्यार्थ्यांचे नूतनीकरण अर्ज अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाकडून मंजूर करण्यात आले आहे. आता उर्वरित ३ लाख ८७ हजार १२० अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित होणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०१५-१६ पासून या योजनेत काही बदल झाले. यंदा प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ह्यनॅशनल स्कॉलरशिप पोर्टलह्णचा उपयोग करण्यात आला. परंतु, सुरूवातीपासूनच त्यावर डेटा भरताना किंवा कागदपत्रे अपलोड करताना शाळांना सतत तांत्रिक अडचणी आल्या. या अडचणींचे निराकरण होत नसल्याने शासनाने पोर्टलवरील आॅफलाईन डेटा शिटमध्ये (एक्सल शिट) माहिती भरून सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी सादर करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार, राज्यातील शाळांनी विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती एक्सल शिटमध्ये भरून शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण संचालनालयाकडे दाखल केली होती. परंतु, आता संचालनालयाकडून जाहीर झालेल्या यादीत हजारो शाळा आणि लाखो विद्यार्थ्यांची नावेच नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी आणि त्यांची माहिती भरणारे शिक्षक पेचात पडले आहेत.राज्यभरातील विद्यार्थ्यांना फटकाविदर्भाप्रमाणेच राज्यातील सर्वच जिल्ह्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीत फटका बसला आहे. त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे : अहमदनगर (प्राप्त अर्ज) १२५३० (मंजूर अर्ज) ६९७४, औरंगाबाद : ५७४६८ : १८६३५, बिड : ३१७०७ : १५६२५, धुळे : ५१३७ : १७८३, हिंगोली : २६४४४ : १३८२६, जळगाव : ३२४७२ : २०१४१, जालना : २६२५७ : १३२९४, कोल्हापूर : १४५३५ : ७८८६, लातूर : २९७६१ : ९६७३, मुंबई : २२०७ : १२८, मुंबई सब अर्बन : १०९९ : २२८, नांदेड : ४५९१५ : १८५६५, नंदूरबार : ४१८२ : २२३८, नाशिक : २३५९७ : १५६७०, उस्मानाबाद : ९१९५ : २२४४, परभणी : २६६९४ : ५५२०, पुणे : ४३९६ : ६०३, रायगड : ३५८२ : १५९८, रत्नागिरी : ११९१८ : ५०५९, सांगली : ९९०५ : ४५६३, सातारा : २२०० : ४१३, सिंधुदुर्ग : २८७३ : १५९७, सोलापूर : २११७५ : ११२४७, ठाणे : ५७८६ : ११५७ विदर्भातील विद्यार्थ्यांची हानीजिल्हाप्राप्त अर्जमंजूर अर्ज अकोला७१८२९४०२४६अमरावती६८७९९२५२५१यवतमाळ३४७७६२०१८७नागपूर७१८७२६३४भंडारा२०३५१३२८बुलडाणा८५६९९४४०५३चंद्रपूर६१८०२४०१गडचिरोली४३९१७४गोंदिया६७८१४३वर्धा४७२६१९११वाशीम२५१४२१४२५९नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी आल्यानेच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. मंजूर अर्जांबाबत आम्ही माहिती अधिकारातून मिळवलेली माहिती धक्कादायक आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडून ज्या विद्यार्थ्यांची माहिती संचालनालयास सादर करण्यात आली, तसेच तांत्रिक अडचणीमुळे सादर होऊ शकली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना या सत्राची शिष्यवृत्ती मिळावी. त्यांना त्वरित अप्लििकेशन आयडी दिल्यास २०१६-१७ साठी ते अर्ज करू शकतील. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.- रजाउल्लाह खान, सचिव, मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर