शहरं
Join us  
Trending Stories
1
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
2
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
3
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
4
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
5
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
6
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
7
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
8
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
9
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
10
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
11
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक
12
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
13
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
14
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
15
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
16
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
17
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
18
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
19
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा

शिष्यवृतीचे खाते गोठविले

By admin | Updated: July 13, 2014 01:04 IST

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. अशा विद्यार्थ्यांची संख्या जिल्ह्यात २३ हजारांवर आहे. शिष्यवृत्ती वाटपात गैरप्रकार होऊ नये यासाठी,

राष्ट्रीयीकृत बँकांची हेकेखोरी : यवतमाळ जिल्ह्यातील २३ हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न रुपेश उत्तरवार - यवतमाळप्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. अशा विद्यार्थ्यांची संख्या जिल्ह्यात २३ हजारांवर आहे. शिष्यवृत्ती वाटपात गैरप्रकार होऊ नये यासाठी, रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश होते. यानुसार विद्यार्थ्यांनी झिरोे बॅलेंसवर काढलेले खाते राष्ट्रीयीकृत बँकांनी गोठविले आहे. त्यामुळे शिक्षण विभाग अडचणीत सापडला आहे.शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी राज्य शासनाने शिष्यवृत्ती जाहीर केली. यामध्ये प्रत्येक घटकांचा विचार करण्यात आला. शिष्यवृत्तीचे वाटप करताना कुठेही गैरप्रकार होऊ नये आणि व्यवस्थापनाकडून त्याचा केला जाऊ नये म्हणून थेट बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विद्यार्थ्यांना बँक खाते काढण्याच्या सूचना महाविद्यालयांनी केल्या.विद्यार्थ्यांचे खाते झिरो बॅलेंसवर काढण्याच्या सूचना होेत्या. यासाठी प्रारंभी राष्ट्रीयीकृत बँकांनी नकार दिला. पाठपुराव्यानंतर बँका यासाठी तयार झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दिलासा मिळाला. आता मात्र स्टेट बँकेने ही खाती गोठविली आहे. सहा महिन्यांपासून कुठलाच व्यवहार नसल्याचे कारण पुढे करीत खाते बंद करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला. हा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पाठविण्यात आला असता बँकेत विद्यार्थ्यांचे खातेच नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे शिष्यवृत्ती द्यायची कशी हा गंभीर प्रश्न शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे. यावर तोडगा न निघाल्यास निधी परत जाण्याची भीती आहे. विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दोन कोटी ३० लाखांपेक्षा अधिक रकमेची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र राष्ट्रीयीकृत बँकेच्या अफलातून निर्णयाने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, बँकांच्या या आडमुठ्या धोरणाविरुद्ध आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा मुख्याध्यापक कृती समिती अध्यक्ष विजय खरोडे यांनी दिला आहे.