शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉलर कॉलेजकुमार बनला चोरटा

By admin | Updated: April 23, 2016 03:58 IST

चैनी, सुखासीन जगण्याची सवय व महागडे मोबाईल, दुचाकी गाड्या वापरण्याच्या हव्यासापोटी सामान्य कुटुंबातील दहावीमध्ये ९५ टक्के गुण मिळविणारा गुणवंत विद्यार्थी घरफोडी करणारा अट्टल चोरटा बनला

कोल्हापूर : चैनी, सुखासीन जगण्याची सवय व महागडे मोबाईल, दुचाकी गाड्या वापरण्याच्या हव्यासापोटी सामान्य कुटुंबातील दहावीमध्ये ९५ टक्के गुण मिळविणारा गुणवंत विद्यार्थी घरफोडी करणारा अट्टल चोरटा बनला. अवधूत ईश्वरा पाटील (वय १९ रा. देऊळवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून दहा घरफोड्यांतील सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप व दोन दुचाकी असा तब्बल ११ लाख ३६ हजार ३२५ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘एक विद्यार्थी दर आठवड्याला वेगवेगळे महागडे मोबाईल वापरत असून त्याच्याकडे दोन महागड्या दुचाकी आहेत. तो आठवड्याला सुमारे चार ते पाच हजार रुपये खर्च करतो,’ अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर पाळत संशयित अवधूत ईश्वरा पाटील (वय १९) याला बुधवारी (दि. १९) पकडले. त्याने गोवा येथे चोरलेल्या पाकिटातील कृष्णात सीताराम बाचणकर यांचा वाहन परवाना देऊन दुचाकी भाड्याने घेऊन ती चोरून आणल्याचे सांगितले. त्यानंतर सावंतवाडी येथून एक मोपेड त्याने चोरली न्यायालयाने त्याला सोमवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिक्षा व्हावी; पालकांची भावनाअवधूत हा महाविद्यालयात वेगवेगळे महागडे मोबाईल, ब्रँडेड कपडे वापरत असल्यामुळे महाविद्यालयामधील मित्र-मैत्रिणी त्याचे कौतुक करत असत. चोरीच्या पैशांतून तो मित्रांना पार्टी देत होता. त्याचबरोबर देऊळवाडी गावाकडे तो दुचाकी घेऊन जात असे. घरच्यांनी विचारले तर ही मित्राची दुचाकी आहे, असे तो सांगत असे. चोरीच्या प्रकाराबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे, असे पाटील कुटुंबीयांचे मत असल्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी पत्रकारांना सांगितले.परीक्षेस बसू देणारअवधूतने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. त्याची गुणवत्ता पाहता त्याला एक मे रोजी होणाऱ्या सीईटीच्या परीक्षेला बसू दिले जाईल. त्याला घडलेल्या कृत्याबाबत पश्चाताप होत आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार नाही.त्याला यातून सुधारण्याची संधी देवू.- प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा