शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

योजनेला राजकारण, थकबाकीचे ग्रहण

By admin | Updated: January 18, 2016 00:36 IST

म्हैसाळ सिंचन योजना : दोन हजार कोटी खर्चून झाली योजना; ‘म्हैसाळ’मागचे दुष्टचक्र थांबणार का?

दादा खोत -- सलगरे -म्हैसाळ सिंचन योजनेत दुष्काळी भागाचा कायापालट करण्याची क्षमता आहे. परंतु तिला लागलेले थकबाकीचे आणि राजकारणाचे ग्रहण, यावरच तिचे भवितव्य अवलंबून आहे. राज्याच्या तिजोरीतून दोन हजार कोटी रुपये खर्चून तयार झालेल्या या योजनेच्या थकबाकीचे ग्रहण मागील पाच वर्षांपासून कायम आहे. मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत व सांगोल्याच्या दुष्काळी भागामध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजना हरितक्रांती करत आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व माजी आमदार विठ्ठलदाजी पाटील या नेत्यांच्या दूरदृष्टीतून म्हैसाळ योजनेचा पाया रचला गेला. परंतु योजना पूर्णत्वाकडे असताना मात्र ती राजकीय व अर्थिक दुष्टचक्रात सापडली. योजना पूर्ण होत असताना तिला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी उपाययोजनांचा प्रयत्न झाला नाही. उलट ‘म्हैसाळ’चे पाणी दुष्काळग्रस्त भागाला टंचाई निधीतून देऊन एका बाजूने दुष्काळग्रस्त तालुक्यांची सहानुभूती मिळविली गेली, तर दुसरीकडे सारे राजकारण ‘म्हैसाळ’भोवतीच फिरत ठेवण्याचा चंग सर्वांनी बांधल्याचे आजवर दिसून आले आहे. अवाढव्य खर्चानंतर आता योजना पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असली तरी, तिला पूर्णपणे व्यावसायिक स्वरूप येण्यासाठी या योजनेचा राजकारणासाठी होणारा वापर बंद झाला पाहिजे. योजना शाश्वतरित्या चालविण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून नियोजन झाले नाही. पाणी नियोजन व वाटपाकरिता ठरल्याप्रमाणे तंतोतंत विश्वासार्ह आराखडा केला नाही आणि काहीवेळा कसाबसा केला, तरी तो पाळला नाही! पाणी वाटपाचे गाव व तारीखनिहाय जाहीर प्रकटन आजवर झाले नाही. या वेळापत्रकावर शेतकरी पिकांचे नियोजन करू शकले असते. मात्र दोन्ही बाजूंनी नियोजनाचा पुरता बोजवारा उडालेला दिसून आला आहे. उसासारख्या पिकाला वर्षभरामध्ये वीसवेळा, तर द्राक्षपिकाला नियमित पाण्याची गरज असते. द्राक्षाला उन्हाळ्यात खरड छाटणीवेळी पाणी नसेल तर बाग वाया जाते. आजवर दर उन्हाळ्यात टंचाई निधीतून पाणी सोडले गेले. मात्र वर्षभर आवर्तनातील नियमितता नसल्याने पुन्हा कूपनलिकांचा आधार घ्यावा लागला. मागील पाच वर्षात मिरज पूर्वभागात कूपनलिकांचा धुरळा उडाला आहे. त्यातूनच शेतकऱ्यांत ‘म्हैसाळ’च्या विश्वासार्हतेबद्दलची शंका दृढ होत गेली. कूपनलिका खोदण्यास लाखो रुपयांचा चुराडा करणारे शेतकरी काही हजार रुपयांतील पाणीपट्टी नक्कीच भरू शकतात, पण पाण्याच्या आवर्तनाची हमीच नाही. त्यामुळे दोन हजार कोटींची योजना केवळ ३० कोटींच्या थकबाकीमुळे सातत्याने अडचणीत येत आहे. दुष्काळ निवारणाचा खर्च या थकबाकीपेक्षा मोठाही असू शकतो. याचा अंदाज घेण्याची तत्परता मंत्रालयातील कुशल अधिकाऱ्यांना वाटलीच नाही. दुष्काळ निवारणाचे गांभीर्य कोणालाच राहिले आहे, याचे प्रत्यंतर मागील चार वर्षात दुष्काळी टापूतील शेतकऱ्यांना आले आहे. (क्रमश:)म्हैसाळ उपसा सिंचन योजना जिल्ह्याच्या दुष्काळी टापूसाठी संजीवनी ठरली आहे. मात्र ती आता दुष्टचक्र ात सापडली आहे. थकबाकीतून सावरण्याकरिता कारखाने पुढे आले आहेत, मात्र शेतकरीही पुढे आले पाहिजेत. थकबाकी, पाणीपट्टी निर्धारण, वसुलीचे क्षेत्र, वसुली मोहीम या सर्वच पातळीवर प्रशासन आजवर शंभर टक्के यशस्वी झालेले नाही. त्यामुळे ‘वाढता वाढता वाढे...’ या नियमाने पाणीपट्टीची थकबाकी आज ३० क ोटीवर पोहोचली आहे. यापैकी वीज बिलाकरिता किमान ११ कोटी रुपयांची गरज आहे. या रकमेसाठी आता प्रशासनाची धडपड सुरू आहे. मात्र आतापर्यंत आलेल्या व दरवर्षी येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना, योजनेचे भवितव्य उज्ज्वल, जबाबदारी वाटप यावर प्रकाश टाकणारी ही मालिका...तीस कोटीच्या थकबाकीने योजना सातत्याने अडचणीतकूपनलिका खोदण्यास लाखो रुपयांचा चुराडा करणारे शेतकरी, काही हजार रुपयांतील पाणीपट्टी नक्कीच भरू शकतात. पण पाण्याच्या आवर्तनाची हमीच नाही. त्यामुळे दोन हजार कोटींची योजना केवळ ३० कोटींच्या थकबाकीमुळे सातत्याने अडचणीत येत आहे. दुष्काळ निवारणाचा खर्च या थकबाकीपेक्षा मोठाही असू शकतो. याचा अंदाज घेण्याची तत्परता मंत्रालयातील कुशल अधिकाऱ्यांना वाटलीच नाही.