शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गरम्य रेल्वे स्थानक दुरवस्थेत

By admin | Updated: May 30, 2016 01:55 IST

येथील रेल्वे स्टेशन हे आजूबाजूच्या ७० गावांचे दळणवळणाचे प्रमुख ठिकाण आहे.

कामशेत : येथील रेल्वे स्टेशन हे आजूबाजूच्या ७० गावांचे दळणवळणाचे प्रमुख ठिकाण आहे. येथून रोज हजारो नागरिक रेल्वेने प्रवास करीत असतात. स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून, मूलभूत सोई सुविधांची दयनीय अवस्था असल्याची तक्रार प्रवासी करतात.स्थानिक व आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना पुणे व मुंबईकडील प्रवासासाठी कामशेत रेल्वे स्टेशन जवळचे आहे. पण, स्टेशनवर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा नसल्याच्या तक्रारी होत आहेत. फलाटावर दोन शौचालये असून, त्यातील एक अत्यंत अस्वच्छ व मोडकळीस आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दुसरे शौचालय बांधले असून ते कित्येक महिने ते कुलूपबंदच आहे. त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त अद्याप सापडलेला नाही, अशी टीका प्रवासी करीत आहेत. नवीन बंद शौचालयाच्या दरवाजावरच प्रवासी लघुशंका करीत असल्याने फलाट परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्टेशनवर महिलांसाठी स्वच्छतागृहाचा अभाव आहे.प्रवाशांसाठीच्या विश्रामगृहात कचऱ्याचे साम्राज्य आहे. दगड-मातीचा राडारोडा पडला आहे. मोकाट जनावरांच्या विष्ठेने या परिसरात दुर्गंधी पसरली असून, विश्रामगृहाचा वापर कोणीही प्रवासी करीत नाही. दोन्ही फलाटांवरील निवाराशेड खूप लहान असल्याने अनेक प्रवाशांना उन्हात लोकलची प्रतीक्षा करावी लागते. काही प्रवासी रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर बसणे पसंत करतात. पण त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरत नाही. विशेष करून महिलांना याचा जास्त त्रास होतो. रोज हजारो नागरिक येथून प्रवास करतात. तरी रेल्वे स्टेशनवर एकच तिकीट खिडकी आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे. अनेकदा तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांग लागते व त्यात अनेक प्रवाशांची गाडी चुकते. स्टेशनच्या बाजूने दुथडी भरून इंद्रायणी नदी वाहते. शेजारी नदी असलेले कामशेत हे बहुधा जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असेल. मावळ परिसरात अनेक पर्यटनस्थळे असून प्राचीन मंदिरे, गड किल्ले, बौद्धकालीन लेण्या, धरणे आदी आहेत. तिथे जाण्यासाठी पुणे-मुंबई परिसरातील पर्यटकांना कामशेत रेल्वे स्टेशन सोईचे असल्याने अनेक पर्यटक येथे येतात. रेल्वे प्रशासनाने या रेल्वे स्टेशनचा कायापालट करून प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी रेल्वे प्रवासी संघटना, पर्यटक व शहरातील जागृत नागरिकांकडून मागणी होत आहे. (वार्ताहर)>दुरून डोंगर साजरे : प्रवाशांची नाराजी ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या भारतीय वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या दूरदर्शनच्या मूळ गाण्यात ‘माझ्या तुमच्या जुळल्या तारा...’ या ओळीसाठी कामशेत रेल्वे स्टेशन व नदीचे दृष्य चित्रित केले आहे. या स्टेशनचे नयनरम्य दृष्य दुरून पाहणे खूप आनंददायी ठरते. मात्र, दुरून डोंगर साजरे या उक्तीप्रमाणे या निसर्गरम्य कामशेत रेल्वे स्टेशनमध्ये सोई सुविधांची वानवा असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.