शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीमध्ये भंगार माफियांचा धुमाकूळ

By admin | Updated: October 31, 2016 02:39 IST

ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भंगार माफियांनी धुमाकुळ घातला आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भंगार माफियांनी धुमाकुळ घातला आहे. दिवाळीदिवशी पहाटे बोनसरीमध्ये बांधकाम साहित्य उचलून नेले. नागरिकांनी अडविल्यानंतर आम्ही सैदुल्लाची माणसे आहोत तुम्ही आम्हाला काही करू शकत नाही. एक ठिकाणी चोरी केली आता दुसऱ्या ठिकाणी करायला चाललो आहोत असे खुले आव्हाण दिले. नागरिकांनी पोलिसांना कळविताच चोरट्यांनी तेथून पळ काढला.बोनसरी गावाजवळ भुखंड क्रमांक डी १३ / ५ येथे वेअर हाऊसचे बांधकाम सुरू आहे. रविवारी पहाटे येतील लोखंडी सळया व इतर साहित्य चोरट्यांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. बांधकामाच्या ठिकाणावरून साहित्य उचलून बाजूच्या ओढ्यातून ते बोनसरी गावच्या चौकात आणून ठेवले जात होते. तेथून टेंपोमधून ते इतर ठिकाणी पोहचविले जात होते. रात्री दोन वाजता येथील रहिवासी ट्रक घेवून घरी आला होता. वाहनांचीही चोरी होत असल्याने तो ट्रकमध्येच झोपला होता. तिन वाजेपासून चोरट्यांनी बांधकाम साहित्य घेवून जाण्यास सुरवात करताच त्याने परिसरातील नागरिकांना याविषयी माहीती दिली. नागरिकांनी चोरट्यांना जावून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही सैदुल्लाची माणसे आहोत. येथून बांधकाम साहित्य पळवून नेत असून आता दुसऱ्या ठिकाणी जातोय तुम्हाला काय करायचे आहे असा प्रश्न उपस्थित केला. नागरिकांनी चोरट्यांचे फोटो काढण्यास सुरवात केल्यानंतर त्यांनी न घाबरता बिनधास्त फोटो काढा, आम्हाला कोणी काहीही करू शकत नाही असे उद्धट बोलण्यास सुरवात केली. रहिवाशांनी पोलिस स्टेशनमध्ये फोन केल्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला. औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. या कंपन्यांमधील लोखंड, पत्रे व इतर साहित्य चोरी करणाऱ्या अनेक टोळ्या या परिसरात सक्रिय आहेत. काही भंगार चोरांच्या टोळ्यांमध्ये महिलांचाही सहभाग आहे. टेंपो व इतर वाहने घेवून बिनधास्तपणे भंगार चोरून घेवून जात आहेत. बंद कंपन्यांमधील भंगारामधून लाखो रूपयांची कमाई होत आहे. एमआयडीसीमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक वेळा भंगार चोरी होत असल्याचे निदर्शनास येते पण चोरट्यांच्या हातामधील लोखंड गज व इतर शस्त्रांमुळे त्यांना अडविण्याचे धाडस कोणालाच होत नाही. चोरट्यांचा धुमाकुळ वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री घराबाहेर पडण्याचीही भिती वाटत आहे. मध्यरात्री कामावरून येणाऱ्या नागरिकांनाही जीव मुठीत घेवून एमआयडीसीमधून प्रवास करावा लागत आहे. बोनसरी व इतर अनेक ठिकाणी रोडवर उभ्या केलेल्या वाहनांमधील टेप, टायर व इतर साहित्याचीही चोरी होवू लागली आहे. भंगार माफियांचा उपद्रव थांबविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. रबाळेमध्ये यापुर्वी भंगार माफियांनी हवालदार गोपाळ सैंदाणे यांची हत्या केली होती. त्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पोलीस चौकीची मागणी बोनसरी गाव परिसरामध्ये चोरीच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपुर्वी या परिसरामध्ये गांजा विक्री होत असल्याचेही निदर्शनास आले होते. वाहनांमधील टेप व इतर साहित्य चोरण्याचे गुन्हेही होत असतात. या सर्व घटनांमुळे रात्री ११ नंतर येथील नागरिकांना बाहरे जाण्याची भिती वाटत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी येथे बिट चौकी करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. चोरट्यांचे फोटोसेशन भंगार चोरी करणाऱ्यांना नागरिकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी न भिता आम्ही एक ठिकाणचे साहित्य चोरले आता दुसरीकडे जातोय असे उत्तर दिले. नागरिकांनी मोबाईलवर फोटो काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर चोरट्यांनी न घाबरला बिनधास्त फोटो काढा, आम्हाला कोणी काही करू शकत नाही असे स्पष्ट केले. साहित्याची चोरीरविवारी पहाटे चोरी झालेल्या वेअर हाऊसच्या साईटवर यापुर्वीही चोरी झाली होती. औद्योगिक वसाहतीमध्ये हा प्रकार नेहमीचाच झाला आहे. कुठेही बांधकाम सुरू झाले की चोरटे रात्री बांधकामासाठीचे लोखंड, पत्रे, सिमेंटची चोरी करत आहेत. सुरक्षा रक्षकांनी अडविल्यास त्यांना शस्त्राचा धाक दाखविला जातो. भितीमुळे अनेकवेळा उद्योजक तक्रारही करत नाहीत.