शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळा ४०० नव्हे, चार हजार कोटींचा

By admin | Updated: May 17, 2017 01:49 IST

गेल्यावर्षी राज्यात झालेल्या तुरीच्या उत्पादनाच्या सरकारी माहितीमध्ये तब्बल १० लाख टनांची तफावत आहे. तूर साठेबाजीत सत्ताधाऱ्यांचाच संबंध असण्याचा संशय आहे

- लोकमत न्यूज नेटवर्क

गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) : गेल्यावर्षी राज्यात झालेल्या तुरीच्या उत्पादनाच्या सरकारी माहितीमध्ये तब्बल १० लाख टनांची तफावत आहे. तूर साठेबाजीत सत्ताधाऱ्यांचाच संबंध असण्याचा संशय आहे. त्यात चारशे कोटींचा घोटाळा असल्याचे मुख्यमंत्री म्हणत असले, तरी हा घोटाळा चार हजार कोटींचा आहे. या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडून करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे केली.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील (गिजवणेकर) यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्यानिमित्त चव्हाण येथे आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. गतवर्षी ११ लाख ७१ हजार टन तुरीचे उत्पादन झाल्याची माहिती सरकारने १७ मार्च २०१७ रोजी विधानसभेत दिली. त्यानंतर २५ एप्रिल २०१७ रोजी २० लाख ५० हजार टन तुरीचे उत्पादन झाल्याचे सांगितले. व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच हा गलथानपणा करण्यात आला आहे. अवघ्या पाच आठवड्यांत उत्पन्नाची आकडेवारी फिरवणारे हे कसले सरकार? असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला. आघाडी सरकारच्या काळात डाळींची साठाबंदी करण्यास बंदी घातली होती. ‘युती’ने ती बंदी गेल्यावर्षी उठवली, त्यामुळेच ‘तुरी’चा घोटाळा झाला, अशी टिपणीही त्यांनी केली.पंतप्रधान मोदी यांनी उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्याठिकाणी कर्जमाफी दिली. उत्तरप्रदेशपेक्षाही महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट आहे. मुख्यमंत्र्यांना आपली मागणी तत्त्वत: मान्य असूनही ते निर्णय घ्यायला तयार नाहीत, असेही चव्हाण म्हणाले. ‘महाड’मधून संघर्ष यात्रेचा चौथा टप्पाशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा चौथा टप्पा ‘महाड’ येथून उद्या (बुधवारी) सुरू होईल. तेथून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यात्रा काढण्यात येणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.भाजपाकडून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट केले जात आहे. कोणत्यातरी प्रकरणात अडकवून दहशत माजविण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. त्याविरोधात आता संघटित लढाई लढावी लागेल.- आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री