शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

अनधिकृत बांधकामे तोडण्यातही घोटाळा

By admin | Updated: July 11, 2017 03:49 IST

ठेकेदाराला महापालिकेने दिलेली रक्कम संबंधित बांधकामाच्या मालकाकडून वसूलच केली जात नसल्याचा ठपका लेखापरिक्षण अहवालात ठेवण्यात आला

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : महापालिका हद्दीतील ़अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे पाडण्यासाठी ठेकेदाराला महापालिकेने दिलेली रक्कम संबंधित बांधकामाच्या मालकाकडून वसूलच केली जात नसल्याचा ठपका लेखापरिक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे. अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामासंदर्भात लेखापरिक्षकांना महापालिकेने कोणतीही माहिती पुरवली नसल्याचा ठपकाही अहवालात ठेवल्याची माहितीही शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांना माहितीच्या अधिकाराद्वारे पुरविण्यात आली आहे. महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त, ठेकेदार, ठेका अभियंता यांच्याशी मजूर व जेसीबी पुरवणारे कंत्राटदार यांची अभद्र युती कोट्यवधींचा अपहार करीत असल्याची तक्रार गावडे यांनी मु्ख्यमंत्र्यांकडे केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या विधी व न्याय विभागाच्या मुंबई स्थानिक स्वराज्य निधी लेखा परिक्षा अधिनियम १९३० अन्वये लेखा परिक्षकांनी लेखापरिक्षणासाठी लेखे सादर करण्याची मागणी केल्यास संबंधित स्थानिक प्राधिकरणांनी विहीत वेळेत लेखे सादर करणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १०५, १०६ व अनुसूची ड प्रकरणी ३ (२) नुसारह लेखापरिक्षकांनी मागणी केलेले अभिलेखे लेखापरीक्षणास सादर करणे बंधनकारक असतांनाही महापालिकेने ते सादर न करून अधिनियमातील नियमांचा भंग केल्याची त्यांनी तक्रार केली आहे.प्रभाग समिती विरार (अ) , नालासोपारा (ई,ड़ी), नवघर माणिकपूर (एच), वसई (वाय) यांच्याकडे अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम नियंत्रण बाबतचे लेखे सादर करण्याची मागणी केली असता या विभागांनी लेखापरिक्षकांना कोणताही खुलासा, तपशील, माहिती सादर केली नाही. त्यामुळे महापालिकेने अनधिकृत बांधकामांसंबंधी केलेली कार्यवाही, निष्कासित बांधकामांच्या खर्चाची मागणी व वसुली यांची तपासणी लेखापरिक्षकांना करता आली नाही. शहरात अनधिकृत बांधकामे अथवा अतिक्रमणे दूर करताना त्याची नोंद ठेवणे गरजेचे असते. तसेच इमारत पाडल्यानंतर तिचे क्षेत्रफळ नोंदविणे बंधनकारक असते. त्यावरूनच संबंधित ठेकेदारांना खर्चाचे पैसे अदा केले जातात. मात्र, अशा कोणत्याही नोंदी न ठेवताच ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. कारवाई न करताही ठेकेदारांना पैसे अदा केल्याचा आरोप केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे कारवाई केल्यानंतर त्यावेळी झालेला खर्च संबंधित बिल्डर अथवा अतिक्रमण करणाऱ्यांकडून वसूल करणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिकेने शेकडो अनधिकृत बांधकामे पाडली आहेत. शेकडो अतिक्रमणे दूर केली आहेत. मात्र, संबंधितांकडून त्याच्या खर्चाची वसुली केली न गेल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपये बुडीत गेले आहेत. >महापालिकेत सुरू आहे गोरखधंदाअनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी व हटविण्यासाठी मजूर पुरविणारे आणि जेसीबी व अन्य मशिनरी पुरविणारे ठेकेदार यांना मात्र पैसे अदा करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेकडे अतिक्रमणांवर केलेल्या कोणत्याही कार्यवाहीची सर्वसाधारण माहिती देखील उपलब्ध नाही. त्यामुळे कोणाकडून किती घेणे होते, याचा थांगपत्ताच लागत नाही.>लेखा-परीक्षकांनी घेतलेले आक्षेप...२०१४-१५ या वित्तीय वर्षाचे अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम नियंत्रणासंदर्भातील अभिलेखे, बीट निहाय नोंदवही, तक्रार नोंदवही, एमआरटीपी नोंदवही, निष्कासन खर्च व वसुली नोंदवही आदी अभिलेखे आणि दस्तऐवज सादर केले नाहीत.शासकीय तसेच सार्वजनिक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांची माहिती (संख्या) सादर केली नाही. वन विभागाच्या जागांवर झालेल्या अतिक्रमणांची माहिती (संख्या) सादर केलेली नाही.क्षेत्रातील आरक्षित भूखंडाची माहिती (संख्या) सादर केलेली नाही.अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण विभाग कार्यान्वित झाल्यापासून ते २०१४-१५ पर्यंत निष्कासित बांधकामे, फी वसुली व प्रलंबित रकमेची माहिती, आकडेवारी सादर केली नाही.