शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआयच्या संकेतस्थळाचा दुरुपयोग!

By admin | Updated: April 26, 2017 02:24 IST

अकोला- भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाच्या रिक्रुटमेंट संकेतस्थळाचा दुरुपयोग करून अमरावती विभागात बेरोजगारांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची खळबजनक बाब उजेडात आली आहे.

डी-ग्रुपच्या नोकर भरतीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक

संजय खांडेकर - अकोलाभारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाच्या रिक्रुटमेंट संकेतस्थळाचा दुरुपयोग करून अमरावती विभागात बेरोजगारांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची खळबजनक बाब उजेडात आली आहे. परंतु याबाबत तक्रार करण्यास कुणीही पुढे येत नाही. दरम्यान, याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाने २८ एप्रिल २०१३ मध्ये विविध पदांसाठी नोकर भरतीसाठी अर्ज मागविले होते. या परीक्षेचा निकालही लागला होता. बँकेच्या संकेतस्थळावरील या निकालाच्या ‘डेटा’ ची नकल काही महाठगांनी केली. यानंतर बेरोजगार तरुणांचा शोध घेतला आणि त्यांना बँकेत नोकरी देण्याचे आमिष दाखविले. सरळ नोकरी मिळत असल्याने अनेक तरुण या महाठगांच्या जाळ््यात अडकले. त्यांनी पैसेही दिले. पैसे मिळाल्यानंतर या टोळीने पैसे घेतलेल्या तरुणांना बँकेच्या संकेतस्थळावरील ‘व्ह्यूव रिझल्ट’ दाखवले. रजिस्ट्रेशन क्रमांक, आसन क्रमांक, नाव, वडिलांचे नाव,जन्म तारीख, पोस्ट अ‍ॅप्लाइड आणि पोजिझन आदी सर्व माहिती तरुणांना दाखवून त्याचे प्रिंटआउटही दिले गेले. कोणतीही परीक्षा न देता, थेट निवड झाल्याचे पाहून युवकाना आनंद झाला होता. यापैकी दोन युवकांनी त्यांच्या निवडीची शहनिशा करण्यासाठी अकोल्यातील टॉवर चौकातील स्टेट बँक आॅफ इंडियाचे थेट कार्यालय गाठले. बँक अधिकाऱ्यांना त्यांच्या निवड झाल्याचे सांगितले व सोबत असलेला कागदही दाखविला. यावेळी स्टेट बँकेने २०१३ नंतर नोकर भरती केली. आधीपासून स्टेट बँकेत रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाच डी-ग्रुपच्या नोकरभरतीत सामाविण्यात आल्याचे सांगितले. ही माहीती मिळताच बँकेत नोकरी मिळाल्याचा आनंद असलेल्या या तरुणांच्या पायाखालची वाळू सरकली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, या युवकांना बँक अधिकाऱ्यांनी तक्रार करण्याचे सांगितले; मात्र फसवणूक झालेल्या या प्रक्रियेत तेवढेच दोषी असलेल्या या युवकांनी पोलीस किं वा बँकेकडे लेखी स्वरूपात तक्रार केली नाही. या बेरोजगारांनी तक्रार केली नसली तरी बँकेची बनावट संकेतस्थळ तयार करणाऱ्या या ठगांच्या शोधाची अपेक्षा केली जात आहे.एसबीआयच्या संकेतस्थळाचा दुरुपयोग करून कुणी फसवत असेल तर त्यांनी पोलिसांकडे किंवा मुंबईच्या भारतीय स्टेट बँकेकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. अद्यापपर्यंत यासंदर्भात कुठलीही तक्रार आमच्यापर्यंत पोहचली नाही. -प्रदीप उपासने, मुख्य व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक अकोला.