शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांना प्रतिगामी म्हणणे, हिंदुत्वाची वैचारिक हत्याच

By admin | Updated: February 28, 2016 01:46 IST

हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी प्रतिगामी म्हणून कायमच हिणविले असून, पुरोगामी विचारवंतांकडून ही एक प्रकारे वैचारिक हत्त्याच

नाशिक : हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी प्रतिगामी म्हणून कायमच हिणविले असून, पुरोगामी विचारवंतांकडून ही एक प्रकारे वैचारिक हत्त्याच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शेषराव मोरे यांनी केले.येथील शंकराचार्य संकुलातील कुर्तकोटी सभागृहात शंकराचार्य न्यासच्या वतीने ‘पुरोगामी दहशतवाद’ या विषयावर डॉ. मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पुरोगामी विचारवंताकडून हल्ली हिंदुत्व आणि स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांना प्रतिगामी ही भयानक शिवी दिली जात आहे. बुरसटलेल्या विचारांचा, जातीयवादी, रुढी-परंपरा माननारा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा अशा वैचारिकतेच्या शिव्यांचे प्रतिबिंब म्हणून पुरोगाम्यांकडून ‘प्रतिगामी’ हा शब्द दिला गेला आहे. प्रतिगामी समजणे म्हणजे ही एक प्रकारे वैचारिक हत्त्या आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारखी केंद्रे ही त्याचे मूळ आहेत. देशातील सर्वच मोठ्या विद्यापीठावर कार्यरत असलेले कुलगुरू हे पुरोगामी विचारांचे आहेत. कोणी जर हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर शोधनिबंध तयार करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा शोधनिबंध नाकारला जात आहे. पुरोगामी विचारांच्या सहाय्यानेच शोधनिंबध लिहिला तर तो मान्य केला जातो, हे दुर्दैवी आहे. यावेळी डॉ. शेषराव मोरे यांनी नांदेड येथील त्यांच्या एका विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधाचे उदाहरण दिले. सावरकरांइतका बुद्धिवाद आजच्या एकाही बुद्धिवाद्यात नाही. तसेच ‘वन मॅन वन वोट’ ही संकल्पना सर्वात आधी मानणारे सावरकरच होते. सावरकरांना हिंदू धर्माची नव्हे तर हिंदूंची चिंता होती. कारण त्यावेळी कॉँग्रेसचे अध्यक्ष असलेले मौलाना आझादांनी मुस्लिमांना लोकसंख्येच्या ५० टक्के आरक्षण मागितले होते, असेही मोरे म्हणाले. (प्रतिनिधी)