शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदचे मुंबई पोलिसांशी साटेलोटे

By admin | Updated: November 4, 2015 04:41 IST

मुंबई पोलीस दलातील काहींचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी साटेलोटे असल्याचा धक्कादायक आरोप छोटा राजनने केला आहे. मुंबई पोलीस दलातील काही जण दाऊदसाठी त्याच्या

बाली/मुंबई : मुंबई पोलीस दलातील काहींचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी साटेलोटे असल्याचा धक्कादायक आरोप छोटा राजनने केला आहे. मुंबई पोलीस दलातील काही जण दाऊदसाठी त्याच्या इशाऱ्यानुसारच काम करतात. केंद्र सरकारने ही बाब लक्षात घेऊन मला न्याय द्यावा, असे साकडे त्याने घातले आहे. मी दाऊदला घाबरत नाही; त्यामुळे मी दाऊद व दहशतवादाविरुद्धचा लढा सुरूच ठेवणार आहे, अशी पुस्तीही त्याने जोडली. इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर छोटा राजनला बाली पोलिस मुख्यालयातून कोठडीत हलविण्यात येत असताना त्याने पत्रकारांपुढे म्हणणे मांडले.राजन म्हणाला, सरकार मला दिल्ली किंवा मुंबई कुठेही ठेवू शकते; परंतु माझ्यावर अन्याय व्हायला नको. मुंबई पोलिसांनी माझ्यावर खूप अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. माझ्याविरुद्धचे सर्व गुन्हे धादांत खोटे असल्याचे सांगून भारत सरकारने मला न्याय द्यावा, असे तो म्हणाला. दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्याचा डाव मुंबई पोलिसांतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे कसा फसला, याबाबत माजी गृहसचिव आर. के. सिंह यांनी दोन महिन्यापूर्वी जाहीर वाच्यता केल्यानंतरही महाराष्ट्र सरकारकडून मात्र यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. सिंह यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपात तथ्य असल्यास चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी चौकशीबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. या संदर्भातील चौकशी कुठवर आली यासंबंधी विचारणा करणारे अनेक मेसेज आणि फोन करूनही अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी आणि मुंबई पोलिस आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.