शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

सावंतवाडी, कुडाळात बॉम्बच्या अफवेने खळबळ

By admin | Updated: August 14, 2015 22:57 IST

न्यायालयांची झाडाझडती : दूरध्वनीमुळे धावपळ

सावंतवाडी/कुडाळ : सावंतवाडी व कुडाळ न्यायालयात बॉम्ब ठेवल्याच्या निनावी दूरध्वनीने जिल्हा पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली. पणजी नियंत्रण कक्षाकडे आलेल्या दूरध्वनीची माहिती सिंधुदुर्गच्या पोलीस यंत्रणेला देण्यात आल्यानंतर कुडाळ व सावंतवाडी न्यायालये खाली करून तेथील आवाराची बॉम्ब शोधक पथकामार्फत तपासणी करण्यात आली. पण काहीच संशयास्पद आढळले नसल्याने ही अफवा असल्याचे सिध्द झाले. दरम्यान, निनावी दूरध्वनी करणाऱ्याचा सिंधुदुर्ग पोलीस शोध घेत आहेत. स्थानिक पोलिसांनी सावंतवाडी आणि कुडाळ न्यायालयांत धाव घेत न्यायालयासह परिसर रिकामा करण्यात आला. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास पणजी नियंत्रण कक्षाला निनावी फोनद्वारे ही माहिती देण्यात आली. पणजी नियंत्रकांनी तत्काळ ही माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दूरध्वनीवरून कळविली. ओरोसहून तत्काळ बॉम्ब शोधक पथक कुडाळ येथे रवाना करण्यात आले. न्यायालय व परिसराची या पथकामार्फत तपासणी करण्यात आली. यावेळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले. पण दीड तासाच्या तपासणीनंतरही संशयास्पद अशी काहीच वस्तू आढळली नाही. शेवटी न्यायाधिशांची गाडीही तपासण्यात आली. पण तेथेही काही आढळले नाही. न्यायालयाचे कामकाज जवळपास तीन तास थांबविण्यात आले. न्यायालयातील सर्व कर्मचारी न्यायालयापासून एक किलोमीटर अंतरावर थांबले होते. सावंतवाडीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी तत्काळ न्यायालयात पोहोचून न्यायालयात बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी दूरध्वनी आल्याचे सांगून न्यायालय खाली करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार न्यायालयात ही बातमी पसरताच न्यायालय पाचच मिनिटात रिकामे झाले. या दरम्यान सावंतवाडी पोलीस निरीक्षक रणजित देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन सावंत आदींनी न्यायालय व आवारात प्राथमिक स्वरूपात तपासणी केली. तब्बल तीन तासानंतर ओरोस येथील बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासणीनंतरही संशयास्पद असे काहीच सापडले नाही. या तपासणीनंतर न्यायालय आवारातील न्यायाधीश, वकील, पक्षकार यांच्यासह उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दुपारी ३ नंतर न्यायालयाचे काम सुरळीत झाले. पण न्यायालयात जाताना प्रत्येकाच्या मनात भीती होती. (वार्ताहर)गाडीची दुरुस्ती आणि तपास कुडाळ न्यायाधिशांच्या गाडीत कित्येक दिवस बिघाड होता. तो दुरुस्तीसाठी तीन दिवसांपूर्वीच एका गॅरेजमध्ये गाडी लावली होती. ती आजच वापरात आली होती. त्यामुळे या पथकाने गाडीची पंधरा मिनिटे कसून तपासणी केली.सावंतवाडीत तीन तासानंतर पथक दाखलन्यायालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आल्यानंतर न्यायालय क्षणार्धात खाली करण्यात आले. प्रत्येकजण काहीतरी भीषण घडेल, या भीतीत वावरत होता. पण कुडाळ येथील तपासणी पूर्ण करून तब्बल तीन तासांनंतर बॉम्ब शोधक पथक दाखल झाले.प्रतिक्रियापणजी नियंत्रकांमार्फत आलेल्या दूरध्वनीनंतर आमची यंत्रणा कार्यान्वित झाली. तपासाअंंती काही मिळाले नसले, तरी जिल्हा यंत्रणेत मात्र यामुळे खळबळ उडाली. शेवटी याठिकाणी काहीही संशयास्पद सापडले नाही, अशी प्रतिक्रिया बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख दिलीप पाटील यांनी दिली.