शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सावित्री पूल दुर्घटनेचा धडा, २१०० पूल धोकादायक - चंद्रकांत पाटील

By admin | Updated: August 25, 2016 21:02 IST

सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील शिवकालीन, ब्रिटीशकालीन पुलांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये तब्बल २१०० पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 25  : सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील शिवकालीन, ब्रिटीशकालीन पुलांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये तब्बल २१०० पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. यामध्ये शंभर पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. पुलांची ही स्थिती लक्षात घेऊन यापुुढे देखभाल दुरुस्तीसह अन्य सर्वच कामांसाठी स्वंतत्र विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुलांची तपासणी, देखभाल-दुरुस्ती व संनियंत्रण या विषयावर कार्यरत वरिष्ठ अभियंत्यांसाठी यशदा येथे चर्चासत्र झाले. चर्चासत्राचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष सिंग, सचिव (इमारती) सी. पी. जोशी, सचिव (रस्ते) एस. डी. तामसेकर, सेवानिवृत्त सचिव के. एस. जांगडे, मुख्य अभियंता प्रवीण किडे सहभागी झाले होते. याशिवाय अनेक अनुभवी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पाटील यांनी सांगितले की, सावित्री दुर्घटनेनंतर पुलांचा विषय शासनाने गाभीर्याने घेतला आहे. यासाठी हे चर्चासत्र संपल्यानंतर तज्ज्ञ तीन-चार व्यक्तींची समिती स्थापन करण्यात येणार असून, राज्यातील धोकादायक पुलांची पुढील दिशा ठरविण्यासाठी खास उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच इमारत, रस्त्यांप्रमाणेच आता पूल असा स्वतंत्र विभाग सुरु करण्यात येणार आहे. या विभागामार्फत नवीन पुलांचे डिझाईन करणे, बांधकामांचे नकाशे, प्रत्येक काम सुरु असताना देखरेख करणे, निकषानुसार काम होते किंवा नाही यांची तपासणी करण्यात येणार आहे.

तसेच या विभागामार्फत वर्षांतून दोन वेळा सर्व पुलांची तपासणी करून येणारा अहवाल सर्वांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीमध्ये २१०० पूल धोकादायक असल्याचे म्हटले आहे. यामध्ये शंभर पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. या पुलांच्या कामासाठी किंती निधी लागले हे काढण्याचे काम सुरु आहे. डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यासाठी अधिक निधीची मागणी करण्यात येणार असून, मे २०१७ पर्यंत सर्व पुलांची दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.