शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत

By admin | Updated: May 11, 2016 04:12 IST

पाण्याचा सर्वाधिक वापर आणि नासाडी हॉटेल्स, रेस्टॉरंटस्मध्ये होते. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जलमित्र अभियानाचा प्रारंभ त्या ठिकाणी केल्याचा सकारात्मक परिणाम एका दिवसात दिसून येत आहे

मुंबई : पाण्याचा सर्वाधिक वापर आणि नासाडी हॉटेल्स, रेस्टॉरंटस्मध्ये होते. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जलमित्र अभियानाचा प्रारंभ त्या ठिकाणी केल्याचा सकारात्मक परिणाम एका दिवसात दिसून येत आहे. पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविण्यासाठी कर्मचारी आणि वेटर्स गंभीरपणे प्रयत्न करीत असल्यामुळे एरवी वाया जाणाऱ्या पाण्यामुळे आता ‘जलमित्र’चे ड्रम्स भरून जात आहेत.या राज्यव्यापी अभियानाचा सोमवारी प्रारंभ झाला. राज्यातील प्रत्येक शहरातील सुमारे ७५० हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅन्टीनमध्ये जलबचतीचा संदेश देणारे पोस्टर्स लावण्यात आले. याशिवाय तेथील कर्मचाऱ्यांना पाण्याचे महत्त्व, पाणी वाचविण्याच्या पध्दती समजावून सांगण्यात आल्या. जलमित्र अभियान ज्या हॉटेल्समध्ये सुरू झाले. तेथे ‘लोकमत’च्या वतीने ड्रम्स दिले आहेत. या अभियानाच्या प्रत्यक्ष कृतीच्या आजच्या पहिल्या दिवशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी सायंकाळी हॉटेल्सला भेटी देऊन पाहणी केली असता तेथे ड्रम्समध्ये निम्म्याहून अधिक पाणी साचल्याचे दिसून आले.हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या कर्मचाऱ्यांचा जलमित्र अभियानात कृतिशील सहभाग दिसून आला. वेटर्सनी आज ग्राहकांसमोर पाण्याने भरलेला जग ठेवण्यापेक्षा ग्राहक जितके मागतील तितकेच पाणी दिले. पाणी प्यायल्यानंतर ज्या ग्राहकाने ग्लासात पाणी ठेवले होते. ते पाणी सिंकमध्ये ओतून देण्यापेक्षा वेटर्सनी ते ‘जलमित्र’च्या ड्रममध्ये साठविले. या पाण्याचा पुनर्वापर हॉटेल्समधील झाडांना, वेलींना तसेच फरशी स्वच्छ करण्यासाठी करण्याच्या सूचना हॉटेल चालकांनी दिल्या असल्याचे वेटर्सनी सांगितले. जलमित्र अभियानाचा हा पहिला आठवडा असून, हॉटेल्सप्रमाणेच औद्योगिक वसाहतीतील कंपन्या, शहरांमधील मॉल्स, मल्टिप्लेक्समध्येही अशाच प्रकारे जनजागरण करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)