शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय खाद्यसंस्कृतीचे मोबाईलच्या माध्यमातून जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 01:18 IST

‘सणोत्सव व पाककृती’ : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थिनींनी तयार केले बहुमोल माहितीपूर्ण ‘अ‍ॅप’

प्रदीप शिंदे ।  -लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भारतीय खाद्यसंस्कृतीला हजारो वर्षांची परंपरा आहे. ऋतंूतील वातावरणाच्या बदलांनुसार शरीरातील पचन व पोषण क्षमता कमी-अधिक होत असते, त्यानुसार आपल्याकडील आहारात बदल केला जातो. मात्र, आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण त्यापासून दूर जात आहे. नव्या पिढीला आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या याच गोष्टींची माहिती देण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थिनींनी ‘भारतीय सणोत्सव व पाककृती’ हे मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. आपल्याकडे प्रामुख्याने उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशी ऋतूंमध्ये विभागणी होते. ऋतू बदलांप्रमाणे आपल्या शरीरातही बदल होत जातो. शरीर आणि वातावरणातील बदलानुसार आपण आपल्या आहार-विहारातही बदल केला तरच शरीर तंदुरुस्त राहते. एकाच प्रकारचा आहार-विहार सर्व ऋतूंमध्ये लागू पडत नाही. त्यासाठी आहारात बदल करणे आरोग्यदृष्ट्या आवश्यकच असते. भारतीय परंपरेत त्यासाठी सणांची जोड दिली आहे. ऋतूनुसार आहार-विहारात बदल न केल्यास काही व्याधी निर्माण होऊ शकतात.बदलत्या जीवनशैलीमुळे नव्या पिढीला सण, उत्सव, हवामान बदलानुसार खाण्यातील पदार्थांचे महत्त्व लक्षात येत नाही. या गोष्टी नव्या पिढीला माहिती व्हाव्यात याच उद्देशाने शिवाजी विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील एम.एस्सी भाग -१ मधील विद्यार्थिनींनी ‘भारतीय सणोत्सव व पाककृती’ हे अ‍ॅप तयार केले आहे. त्यात प्रत्येक सणांची माहिती मिळणार आहे.असे आॅपरेट होते अ‍ॅप...‘गुगल प्ले स्टोअर’मधून हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करत येणार आहे. अ‍ॅपद्वारे मोबाईलवर प्रत्येक महिन्याचे कॅलेंडर येईल. प्रत्येक सणांची माहिती तारखेप्रमाणे येणार आहे. त्या तारखेवर क्लिक केल्यानंतर त्या सणांची माहिती व कोणते पदार्थ खातात यांची माहिती मिळेल. यासह तो पदार्थ कसा तयार करायचा याची सविस्तर माहिती दिली आहे. ज्या दिवशी सण असेल त्या दिवशी सकाळी नऊ वाजता आपल्या अ‍ॅपवर नोटिफिकेशन येते. यासह अ‍ॅपवर सर्च आॅप्शन आहे. त्याचाही वापर करता येणार आहे.यांची कल्पना...ऐश्वर्या अजित राऊत, किरण प्रकाश पोतदार, अक्षता अरविंद देशपांडे या विद्यार्थिनींनी हे अ‍ॅप तयार केले आहे. त्यासाठी त्यांना साधारणपणे पाच महिने लागले आहेत. कमी खर्चामध्ये हे मोबाईल अ‍ॅप या विद्यार्थिनींनी तयार केले आहे. त्यासाठी यांना डॉ. यू. आर. पोळ, डॉ. आर. आर. मुधोळकर, प्रा. प्रसन्न करमरकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हवामान बदलानुसार आहार घेणे गरजेचे आहे हीच माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने आम्ही हे अ‍ॅप तयार केले आहे, अशी प्रतिक्रिया ऐश्वर्या, किरण आणि अक्षता या विद्यार्थिनींनी व्यक्त केली.आपली संस्कृती, आहार यांची माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. यावर प्रत्येक सणांची, खाद्यपदार्थांची माहिती व तयार करण्याची पद्धत दिली आहे. लवकच हे अ‍ॅप्लिकेशन ‘प्ले स्टोअर’वरून अपलोड करता येणार आहे. -प्रा. प्रसन्न करमरकर