शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आरेचे जंगल वाचवण्यासाठी 'आप' आक्रमक

By admin | Updated: February 17, 2017 17:02 IST

मुंबईचे हरित फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या आरेचे जंगल वाचवण्यासाठी मुंबईकरांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आम आदमी पार्टीने (आप) केले आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 -  मुंबईचे हरित फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या आरेचे जंगल वाचवण्यासाठी मुंबईकरांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आम आदमी पार्टीने (आप) केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत आप नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी सर्व राजकीय पक्षांनी आरेबाबत त्यांची अधिकृत भूमिका जाहीर करण्याचे आवाहन केले. यावेळी अभिनेता रघु राम, कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो आणि आरे वाचवा मोहिमेतील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मेनन म्हणाल्या की, २०१४ साली मुख्यमंत्र्यांनी आरे वाचवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता यु टर्न घेत मुख्यमंत्र्यांनी मेट्रो शेड प्रकल्प पुढे रेटण्याचे ठरवले आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकल्पाला स्थगिती दिलेली आहे. तरीही सरकारी बाबुंना हाताशी घेऊन मुख्यमंत्री जंगल नष्ट करून उद्योजकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
आरे जंगल वाचवण्यासाठी सेव्ह आरे कँम्पेन अंतर्गत सोशल मीडियावर चळवळ सुरू केली आहे. २ दिवसांत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना चळवळीतील कार्यकर्ते भेटणार आहे.
शिवाय आरेमध्ये जंगल हवे की कारशेड यावर भुमिका जाहीर करण्याचे आवाहन करणार आहेत. शिवाय ज्यांना कारशेड हवे असेल, त्यांच्याविरोधात मतदान करण्याचे आवाहन मुंबईकरांना केले जाईल.
 
मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत आहे का? 
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द फिरवत आरेमध्ये कारशेड तयार करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना आणखी एक संधी देत असल्याचे मेनन म्हणाल्या. आरेमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही, याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देण्साची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.