शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

सावरकर साहित्य संमेलन होणार ठाण्यात

By admin | Updated: July 26, 2016 04:38 IST

रत्नागिरीनंतर आता पुढील स्वा. सावरकर साहित्य संमेलन ठाण्यात होणार आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलनानंतर स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचा

- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे

रत्नागिरीनंतर आता पुढील स्वा. सावरकर साहित्य संमेलन ठाण्यात होणार आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलनानंतर स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचा मानही ठाण्याला मिळाला आहे. ठाण्यात प्रथमच हे संमेलन होत असून संमेलनाच्या तारखा मात्र लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. ठाणे शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. सांस्कृतिक चळवळीत ठाण्याचे मोठे योगदान आहे. या सांस्कृतिक नगरीत २०१० साली ८४ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन पार पडले, तर २०१६ साली ९६ वे अ. भा. मराठी नाट्य संमेलन झाले. आता २०१७ साली २९ वे अ.भा. स्वा. सावरकर साहित्य संमेलनही पार पडणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्राबाहेर गोवा, हैदराबाद, गुजरात यासारख्या ठिकाणी हे संमेलन झाले आहे. खरे तर, २८ वे स्वा. सावरकर साहित्य संमेलन हे ठाण्यात होणार होते. परंतु, नाट्य संमेलनामुळे ते रद्द करण्यात आले होते. आतापर्यंत ठाण्यात सावरकर साहित्य संमेलन झाले नसून प्रथमच होत आहे, अशी माहिती स्वा. सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी दिली. सावरकर आणि ठाण्याचा जवळचा संबंध होता. त्यांची सासुरवाडी ठाणे जिल्ह्यातील होती. त्यांच्या आयुष्यातील शेवटचे भाषण ठाण्यात झाले होते. तर अंदमानला पाठवण्यापूर्वी त्यांना ठाणे जेलमध्ये ठेवले होते, अशी माहितीही त्यांनी दिली. तीन दिवस रंगणारे हे संमेलन फेब्रुवारी किंवा मार्च या महिन्यात होण्याची दाट शक्यता असून संमेलनाच्या तारखांबरोबर ठिकाणही लवकरच निश्चित होणार आहे. यासंदर्भातील बैठक मुलुंड येथे गुरुवारी पार पडली.