शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराजांवर मुंबईत प्राणघातक हल्ला

By admin | Updated: May 17, 2017 02:40 IST

केईएम रुग्णालयात दाखल : तोंडाला रुमाल बांधून आला हल्लेखोर

आकोट (जि. अकोला) : सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज चिंंचोळकर यांच्यावर शुक्रवारी मुंबईत प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात सत्यपाल महाराज गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अंधश्रद्वा, व्यसनमुक्ती आणि अनिष्ठ रुढी परंपरांविरुद्ध सत्यपाल महाराज आपल्या पुरोगामी विचारसरणीतून प्रहार करतात. महाराष्ट्रातील एक अग्रणी प्रबोधनकार म्हणून त्यांची ओळख आहे. बुद्ध जयंतीनिमित्त मुंबईतील नायगाव दादर येथे सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांनी महाराजांसोबत छायाचित्र काढले. या गर्दीत तोंडाला बांधून एक युवक महाराजांजवळ पोहोचला आणि त्याने महाराजांच्या खांद्यावर हात ठेवण्याचे नाटक करुन चाकूने पोटावर वार केले.सत्यपाल महाराजांनी लगेच स्वत:ला सावरुन हल्ला चुकविण्याचा प्रयत्न केला, यावेळी हल्लेखोर पळून जाण्याच्या तयारीत असताना उपस्थित नागरिकांनी त्याला पकडले. जखमी सत्यपाल महाराजांना लगेचच केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी सत्यपाल विश्वनाथ चिंंचोळकर महाराज यांनी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, आरोपी किशोर जाधव याच्याविरुद्ध भादंवि ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करत आहेत. हल्ल्यामागचा उद्देश काय?सत्यपाल महाराजांवर प्राणघातक हल्ला करणारा कुणाल किशोर जाधव हा नवी मुंबईतील खारघर येथील रहिवासी आहे. कुणालने महाराजांवर हल्ला का केला, याची पोलीस कसून चौकशी करत असून, यामागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.मी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीचा असून, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार राज्यभर करतो. समाजातील अंधश्रद्धा दूर होण्याकरिता समाज प्रबोधन करतो. अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी माझ्यावरही हल्ला झाला, या हल्ल्याने आपण विचलीत झालो नसून, शेवटच्या श्वासापर्यंत आपण महाराष्ट्रात प्रबोधन करुन समाजात जनजागृती करणार. - सत्यपाल महाराज, सप्त खंजिरीवादक