शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

महापालिकेसाठी सतेज-मुश्रीफ-कोरेंची गट्टी

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

प्राथमिक बैठकही पूर्ण : भाजप-ताराराणी आघाडीस शह देण्यासाठी एकत्र येण्याची व्यूहरचना

विश्वास पाटील - कोल्हापूर -महापालिकेच्या राजकारणात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ व जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांची गट्टी जमणार आहे. भाजपने ताराराणी आघाडीला सोबत घेऊन ही निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने हे तीन मातब्बर नेते एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या निर्णयापर्यंत आले आहेत. सतेज पाटील परदेशात जाण्यापूर्वी यासंबंधी मुंबईत प्राथमिक बैठकही झाल्याचे समजते.आता महापालिकेच्या राजकारणात मुश्रीफ व कोरे एकत्रच आहेत. जिल्हा बँक व बाजार समितीतही या दोघांनी एकमेकांच्या ‘सोयीचे राजकारण’ केले आहे. जिल्हा बँकेत बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना मुश्रीफ यांनी संधी दिल्याने कोरे यांना ते रुचले नाही. त्यामुळे त्यांनी मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठविली. परंतु, त्यातून त्यांच्यात दुरावा येण्याचे कारण नाही. मुश्रीफ यांचा भाजपसह चंद्रकांतदादा पाटील यांना विरोध आहे. कारण जिल्हा बँकेत मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाला सुरुंग लावण्याचा दादांचा प्रयत्न होता. सतेज पाटील व कोरे यांचाही महाडिक यांच्या राजकारणाला थेट विरोध आहे. त्यामुळेच हे तिघे एकत्र येण्यात फारशी अडचण नाही. राष्ट्रवादीची महापालिकेची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे असली तरी या पक्षात महाडिक व मुश्रीफ असे दोन छुपे गट तयार झाले आहेत. ज्यांना मुश्रीफ यांचा आशीर्वाद आहे, ते महाडिक यांच्याकडे जाण्याची शक्यता फारच धुसर आहे. शिवाय खासदार महाडिक राष्ट्रवादी म्हणून स्वतंत्र लढण्यापेक्षा ‘ताराराणी’च्या पंखाखाली जाण्याची जास्त शक्यता आहे.लाचप्रकरणात अडकलेल्या माजी महापौर तृप्ती माळवी यांना ताराराणी आघाडीच्याच म्होरक्यांनी पाठबळ दिल्याचे जगजाहीर आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीची बेअबू्र झालीच, शिवाय मुश्रीफ यांचेही माळवी ऐकत नाहीत, असे चित्र लोकांना पाहायला मिळाले. त्याचाही राग मुश्रीफ यांना आहे. त्यामुळे या तिघांची आघाडी झाल्यास अत्यंत काटाजोड लढत होऊ शकते. कारण कुटनीतीचे राजकारण करण्यात हे तिघेही ‘वस्ताद’ आहेत.गेल्या निवडणुकीतही सतेज पाटील यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळत नाही म्हटल्यावर आपले काही कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या छावणीत पाठविले होते. आता तसे न होता या तिघांचीही छावणी एकच असू शकेल. आताच्या घडामोडी तशाच आहेत.क्षीरसागर यांचे काय...?शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर व भाजपमध्ये सध्या जो राजकीय संघर्ष सुरू आहे, त्यामागे महापालिकेचेच राजकारण आहे. आमदार महादेवराव महाडिक यांची मदत घेऊन भाजप जर महापालिकेत सत्तेत आला, तर विधानसभेला क्षीरसागर यांची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे त्यांच्यादृष्टीने भाजप हाच आजचा ‘प्रथम क्रमांकाचा शत्रू’ आहे. क्षीरसागर यांनी आता स्वबळावर लढायची जोरदार तयारी केली आहे. त्यांचे आणि सतेज पाटील यांचे विधानसभेला ‘बावडा’ कनेक्शन असते. एकमेकांचे राजकीय हित त्यांच्याकडून सांभाळले जाते. त्यामुळे सतेज-मुश्रीफ-कोरे या आघाडीत क्षीरसागर थेट सहभागी झाले नाही, तरी त्यांच्याशी पडद्याआड काही ‘अंडरस्टँडिंग’ होऊ शकते. तशा हालचाली सुरू झाल्याचीही चर्चा शहरात आहे.‘कोल्हापूरउत्तर’चा तिढा..कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आमदार महादेवराव महाडिक हे ‘एकाच म्यान्यात दोन तलवारी’ कशा ठेवणार हा प्रश्नच आहे. कारण भाजपतर्फे महेश जाधव हे उमेदवार असतील, तर काँग्रेसतर्फे सत्यजित कदम. गेल्या निवडणुकीत कदम यांनी जोरदार लढत देऊन दुसऱ्या क्रमांकाची तब्बल ४७ हजार मते मिळविली. त्याचवेळी त्यांनी भाजपतर्फे निवडणूक लढविण्याचा आमदार महाडिक यांचा आग्रह होता; परंतु कदम यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने त्यांनी त्यास नकार दिला; अन्यथा भाजपची लाट व कदम यांची स्वत:ची २०-२५ हजार मते या ताकदीवर ते आमदार झाले असते. आताही हा पर्याय बंद झालेला नाही. कदम यांनी ताराराणी आघाडीतून लढण्याचा निर्णय घेतल्याने त्यासंबंधीच्या घडामोडींना पुष्टीच मिळत आहे. विधानसभेला सत्यजित कदम हेच भाजपचे उमेदवार ठरल्यासही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.प्रभाग रचनेनंतरच घडामोडीप्रभाग रचना झाल्याशिवाय कोण कुठे लढणार, याचे चित्र स्पष्ट होणार नाही. आतापासूनच संभाव्य इच्छुकांनी संपर्क साधला व प्रभाग रचनेनंतर त्यांना उमेदवारी देण्यात अडचण आली तर उगीच ते लोक नाराज होतात. त्यामुळे प्रभाग रचना झाल्यावर यासंबंधीच्या घडामोडींना निर्णायक स्वरुप येईल.पक्षीय बलाबलपक्षसंख्याबळपैकी अपक्षांचा पाठिंबाकाँग्रेस३३०२राष्ट्रवादी२६०१शिवसेना-भाजप आघाडी०९०२ जनसुराज्य आघाडी०९०५स्वीकृत सदस्य : ०५