शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

अकोल्यात राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन शनिवारपासून

By admin | Updated: January 28, 2017 02:19 IST

जय्यत तयारी सुरु; वसंत आबाजी डहाके संमेलनाध्यक्ष.

अकोला, दि. २७-अकोला येथे २८, २९ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाला शनिवार, २८ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून, ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके हे संमेलनाध्यक्ष आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने गत चार वर्षांंपासून अकोला येथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. अकोला येथील स्वराज्य भवनाच्या प्रांगणात २८ व २९ जानेवारी रोजी होणार असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्यासह आचार्य हरिभाऊ वेरूळकर, प्रकाश महाराज वाघ, हभप आमले महाराज, खासदार संजय धोत्रे, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, जिल्हाधिकारी जी. ङ्म्रीकांत, आ. रणधीर सावरकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, डॉ. गजानन नारे, डॉ. सुभाष सावरकर व अशोक पटोकार आदी उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अभय पाटील हे असून, या संमेलनात राज्यभरातून संत साहित्यिक, लेखक, समीक्षक, व्याख्याते राष्ट्रीय कीर्तनकार, कवी, भजन गायक, कलावंत, नाटककार, ज्येष्ठ पत्रकार आदींची मांदियाळी राहणार आहे. सामुदायिक ध्यान व चिंतन, योग शिबिरानंतर ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ होईल. हभप रामधन महाराज, डॉ. भाष्करराव विघे, किसनराव पारिसे, रमेशचंद्र सरोदे यांना ग्रामगीता गौरव पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. तसेच प्रा. गोपाल मानकर व ङ्म्रीकृष्ण डंबेलकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाईल. दुपारी चारित्र्य संपन्न समाज घडविण्यासाठी महिलांची भूमिका तसेच शेतीचे अनर्थकारण या विषयावर परिसंवाद होणार आहे. संध्याकाळी चला अकोल्याची हवा येऊ द्या व कविसंमेलन होत आहे. या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्‍वर बरगट, अँड. संतोष भोरे, डॉ. प्रकाश मानकर, गोपाल गाडगे, ज्ञानेश्‍वर साकरकर, डॉ. राजीव बोरकर, श्रीपाद खेडकर, अभिजित राहुरकर व डॉ. रामेश्‍वर लोथे आदींनी केले आहे.