शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

साठे महामंडळाचे महाव्यवस्थापक निलंबित

By admin | Updated: April 21, 2015 02:22 IST

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी सध्याचे महाव्यवस्थापक आणि तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक एस.के.बावणे यांना निलंबित करण्यात आले.

यदु जोशी, मुंबईसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी सध्याचे महाव्यवस्थापक आणि तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक एस.के.बावणे यांना निलंबित करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे सचिव ऊज्ज्वल उके यांनी ही कारवाई केली. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी या घोटाळ्यांप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सूत्रे हलली. तब्बल ११ व्यवस्थापकांना निलंबित करण्यास महामंडळाच्या काही व्यवस्थापक आदींचा समावेश असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. विभागीय अधिकारी अनिल मस्के आणि गिरी हेही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. बावणे आणि ११ बड्या अधिकाऱ्यांवर लवकरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. महामंडळात झालेल्या घोटाळ्यांचा विस्तृत अहवाल विद्यमान प्रभारी व्यवस्थापकीय संचालक यशवंत मोरे यांनी तयार करून राजकुमार बडोले यांना दिला तेव्हा तेही चक्रावून गेले. रमेश कदम यांची आधीच एसीबी चौकशी महामंडळात झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यांप्रकरणी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे (जि. सोलापूर) आमदार रमेश कदम यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) आधीच चौकशी सुरू आहे. त्यांच्या खुल्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तेव्हा सर्वप्रथम ‘लोकमत’ने हे वृत्त दिले होते. आपल्या सूतगिरणीसह विविध ठिकाणी कोट्यवधी रुपये वळते केल्याचा आरोप आहे.