शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारवाडा कलामहोत्सव ५ मार्चला

By admin | Updated: March 1, 2017 00:45 IST

शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सव येत्या रविवार दि. ५ मार्च रोजी शनिवारवाडा येथे सायंकाळी ६ वाजल्यापासून रंगणार आहे.

पुणे : नृत्य आणि सुरेल संगीताच्या अनोख्या आविष्कारांनी नटलेला शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सव येत्या रविवार दि. ५ मार्च रोजी शनिवारवाडा येथे सायंकाळी ६ वाजल्यापासून रंगणार आहे. महोत्सवाचे हे यशस्वी १६वे वर्ष असून, यंदाचा महोत्सव कथकमधील नावीन्यपूर्ण प्रयोगांवर आधारित असल्याची माहिती महोत्सवाच्या संयोजिका सबिना संघवी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रसिद्ध कथक नृत्यांगना मनीषा साठे व महोत्सवाच्या आयोजन समितीच्या सदस्या गायत्रीदेवी पटवर्धन, नीलम सेवलेकर उपस्थित होत्या.शनिवारवाडा महोत्सवात रसिकांना ताल, लय, सूर, उत्कृष्ट पदन्यास यांचा सुरेख संगम अनुभविण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. कथकमधील नावीन्यपूर्ण प्रयोग हे या वर्षीच्या महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. ज्यामध्ये ‘बहुकोन’ व ‘सूरतालांगिक’ हे कलाविष्कार उपस्थितांसमोर सादर केले जातील. शहराबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कथक कलाकारांचा सहभाग हे महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. प्रेरणा देशपांडे यांच्या ‘नृत्याधाम’ या ग्रुपच्या वतीने सादर गणेशवंदनेने महोत्सवाला सुरुवात होणार असून, यानंतर ‘सूरतालांगिक’ हा नृत्याविष्कार उपस्थितांसमोर सादर होईल. कथकचे सूर, ताल, अंगीकम या तीन अंगांवर आधारित ‘सूरतालांगिक’ हा एक पारंपरिक कथक प्रकार असून, या महोत्सवाच्या निमित्ताने तो पुणेकरांसमोर सादर होईल. (प्रतिनिधी)ो>सादर होणार ‘बहुकोन’ नृत्याविष्कार’कदंब’ या ग्रुपच्या वतीने ‘बहुकोन’ हा नृत्यांगना कुमुदिनी लाखिया प्रस्तुत नृत्याविष्कारही या महोत्सवादरम्यान सादर होणार आहे. ज्यामध्ये गत-गती, सुवर्ण, शिवतांडव, अभिनय व तराणा यांचा समावेश असेल. या वेळी संयुक्ता सिन्हा, रुपांशी कश्यप, मिताली ध्रुवा, भक्ती दानी, मानसी मोदी, मिहिका मुखर्जी, कृतिका घाणेकर आदी कलाकार आपली नृत्यप्रस्तुती करतील. या नृत्याविष्काराचे दिग्दर्शन स्वत: कुमुदिनी लाखिया यांनी केले असून, अतुल देसाई यांनी संगीत, हरीश उपाध्याय यांनी प्रकाशयोजना केली आहे.