शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शनिवार ठरला अप‘घात’वार

By admin | Updated: April 16, 2017 02:40 IST

महामार्गावरून प्रवास करताना अपघात घडण्याच्या दुर्घटना अनेकदा घडतात. शनिवारी अशाच दोन दुर्घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेसह डहाणुतील चारोटी नाक्याजवळ घडल्या.

वावोशी / कासा : महामार्गावरून प्रवास करताना अपघात घडण्याच्या दुर्घटना अनेकदा घडतात. शनिवारी अशाच दोन दुर्घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेसह डहाणुतील चारोटी नाक्याजवळ घडल्या. यात एकूण पाच जणांना नाहक जिवाला मुकावे लागले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ शनिवारी सकाळी पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या पीकअप व्हॅनने कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात पीकअपमध्ये बसलेले विकास विलास पाटील (रा. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अंकुश शिंदे (३१ रा. पाटन, जि. सातारा) यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. या अपघातात पीकअप व्हॅनचालक लहू झोरे (रा. मानखुर्द, मुंबई) करकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, खोपोली पोलीस, आयआरबी टीम व खोपोलीतील सामाजिक संघटना अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची दुसरी घटना डहाणूत घडली. डहाणू तालुक्यातील चारोटी नाक्याजवळील तवा येथे महामार्गावर शनिवारी पहाटे २.३० वा.च्या सुमारास मुंबईहून गुजरातकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा कारच्या चालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडरवर जोरात आदळून दोन ते तीनदा पलटी मारून रस्त्याच्या कडेला १५ ते २० फूट खाली कोसळली. या भीषण अपघातात कुणाल साब (२५), विशाल परेश दोडीया (३०), सुखविंदर सिंग गुजराल (३७) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, रवी सातिया रेड्डी (३४), किरण वेंकटरमण अयाती (३२) हे गंभीर जखमी झाले आहेत. अधिक उपचारासाठी त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयातून सिल्वासा येथील विनोबा भावे रुणालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्व जण सुरतचे रहिवासी आहेत. (प्रतिनिधी/वार्ताहर) चालकाची डुलकी ठरली जीवघेणी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर झालेल्या या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. झोप अनावर झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्यामुळेच हा अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.गाडीचालक विजय जाधाव हे बचावले असून, त्यांनीच टोलनाक्यावर येऊन अपघात झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.