शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सातपाटी बंधारा दुरुस्तीसाठी निधी

By admin | Updated: July 2, 2016 03:28 IST

सातपाटीच्या पश्चिमेस केंद्र शासनाने तेरा वर्षापूर्वी लोकार्पण केलेल्या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने समुद्राच्या तुफानी लाटा मच्छिमारांच्या घरांचा वेध घेऊ लागल्या आहेत.

पालघर : सातपाटीच्या पश्चिमेस केंद्र शासनाने तेरा वर्षापूर्वी लोकार्पण केलेल्या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने समुद्राच्या तुफानी लाटा मच्छिमारांच्या घरांचा वेध घेऊ लागल्या आहेत. या बंधाऱ्याच्या दुरूस्तीचा प्रस्तावही धूळखात पडून असल्याने मच्छिमारांच्या घरांना निर्माण झालेला धोका पाहता माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी मच्छिमारच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हा नियोजनच्या आपत्कालीन फंडातून बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी तत्काळ निधी दिला जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी या दरम्यान सांगितले.सातपाटीच्या समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छिमारांची घरे समुद्राला आलेल्या तुफानी वादळ व महाकाय लाटांच्या तडाख्याने उद्धस्त झाल्यानंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या प्रयत्नाने सोळाशे मीटर बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन २ फेब्रुवारी २००३ साली हा बंधारा लोकार्पण करण्यात आला होता. परंतु मागील तेरा वर्षापासून हा बंधारा तुफानी लाटा, उन, पाऊस झेलत कमकुवत झाला होता. या बंधाऱ्याची दुरूस्ती करून त्याची उंची वाढवावी अशी मागणी मच्छिमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्थेने शासनाकडे अनेक वेळा केली होती. ज्या किनारपट्टीवर मतदाराने शिवसेनेला भरभरून दिले त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही त्यांचे सांत्वन करायला लोकप्रतिनिधींना वेळ नसावा. याबाबत मच्छिमारांपुढेही तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. (प्रतिनिधी)गुरुवारी सातपाटीच्या बंधाऱ्यालगत राहणारे मच्छिमारासह माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत सर्वोदय संस्थेचे चेअरमन सुरेश म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, विश्वास पाटील, संजय तरे तर मच्छिमार संस्थेचे चेअरमन राजन मेहेर, व्हा. चेअरमन तानाजी चौधरी, अनिल चौधरी, जयप्रकाश मेहेर, मणीलाल हंबीरे, इ. नी. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांची भेट घेतली.